राहुल गांधींसोबत चर्चा, प्रिया दत्त यांचा निर्णय बदलला?
मुंबई: काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त या पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. प्रिया दत्त यांनी यंदाची लोकसभा निवडणूक न लढण्याची घोषणा केली होती. मात्र काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या कालच्या भेटीनंतर प्रिया दत्त आपला निर्णय बदलण्याची शक्यता आहे. प्रिया दत्त पुन्हा उत्तर मध्य मतदारसंघातूनच लोकसभा निवडणूक 2019 लढवण्याची शक्यता आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी […]
मुंबई: काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त या पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. प्रिया दत्त यांनी यंदाची लोकसभा निवडणूक न लढण्याची घोषणा केली होती. मात्र काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या कालच्या भेटीनंतर प्रिया दत्त आपला निर्णय बदलण्याची शक्यता आहे. प्रिया दत्त पुन्हा उत्तर मध्य मतदारसंघातूनच लोकसभा निवडणूक 2019 लढवण्याची शक्यता आहे.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी काल महाराष्ट्र दौऱ्यावर होते. मुंबईतील बीकेसी मैदानावर त्यांची सभा झाली. यादरम्यान प्रिया दत्त आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट झाली. या भेटीत दोघांची उत्तर पश्चिम मतदारसंघाबाबत चर्चा झाली.
प्रिया दत्त यांनी निवडणूक न लढण्याची घोषणा केली, पण त्यांना पक्षातून निवडणूक लढण्याबाबत आग्रह होता.
दरम्यान राहुल गांधी यांनी कालच्या भेटीत मुंबई काँग्रेसमधील वाद आणि गटबाजी मिटवण्याचे आदेश दिले. निवडणुकीत हेवेदावे बाजूला सारुन सर्व नेत्यांनी एकोप्याने काम करण्याच्या सूचना राहुल यांनी दिल्याचं सांगण्यात येत आहे.
पक्षश्रेष्ठींकडे निवडणूक न लढण्याची विनंती
काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांनी गेल्याच महिन्यात आगामी लोकसभा निवडणूक न लढण्याचं जाहीर केलं होतं. प्रिया दत्त यांनी खासगी कारण देत, लोकसभा निवडणूक लढणार नसल्याची इच्छा पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केली होती. पिता सुनिल दत्त यांच्या निधनानंतर मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून प्रिया दत्त दोनवेळा खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. मात्र 2014 च्या लोकसभा निवडणुकीत प्रिया दत्त यांचा भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांनी पराभव केला होता.
महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीने लोकसभा निवडणुकीसाठी आघाडी केली आहे. सध्या दोन्ही पक्षांची जागावाटपाबाबत चर्चा सुरु आहे. दोन्ही पक्ष 20-20 जागा लढण्याची शक्यता आहे, तर 8 जागा मित्रपक्षांना सोडण्यात येणार आहेत.
संबंधित बातम्या
काँग्रेसला झटका, प्रिया दत्त यांची लोकसभेतून माघार
पूनम महाजन यांच्याविरुद्ध काँग्रेसकडून हा दिग्गज अभिनेता मैदानात?
मामा गोविंदानंतर भाचा कृष्णाचीही निवडणूक लढण्याची तयारी
मुंबई उत्तर मध्य लोकसभा : युती न झाल्यास पूनम महाजनांना मोठा फटका