महाराष्ट्रासह या 10 राज्यात काँग्रेसचा सुपडासाफ, राहुल गांधींसह दिग्गज पिछाडीवर

मुंबई : देशभरात पुन्हा एकदा मोदी लाट दिसत आहे. कल आलेत त्याप्रमाणे निकाल आल्यास 2014 च्या विजयापेक्षाही जास्त मोठा हा विजय असेल. महाराष्ट्रातही शिवसेना आणि भाजपने अभूतपूर्व असं यश मिळवलंय. 12 वाजेपर्यंत काँग्रेसला महाराष्ट्रात केवळ एका जागेवर किरकोळ आघाडी होती. तर राष्ट्रवादी 5 आणि एमआयएमने एका जागेवर आघाडी घेतली आहे. वंचित बहुजन आघाडीला दुसऱ्या क्रमांकाचीही […]

महाराष्ट्रासह या 10 राज्यात काँग्रेसचा सुपडासाफ, राहुल गांधींसह दिग्गज पिछाडीवर
Follow us
| Updated on: May 23, 2019 | 12:50 PM

मुंबई : देशभरात पुन्हा एकदा मोदी लाट दिसत आहे. कल आलेत त्याप्रमाणे निकाल आल्यास 2014 च्या विजयापेक्षाही जास्त मोठा हा विजय असेल. महाराष्ट्रातही शिवसेना आणि भाजपने अभूतपूर्व असं यश मिळवलंय. 12 वाजेपर्यंत काँग्रेसला महाराष्ट्रात केवळ एका जागेवर किरकोळ आघाडी होती. तर राष्ट्रवादी 5 आणि एमआयएमने एका जागेवर आघाडी घेतली आहे. वंचित बहुजन आघाडीला दुसऱ्या क्रमांकाचीही मते मिळालेली नाहीत. महाराष्ट्रासह देशभरात काँग्रेसची हीच परिस्थिती आहे.

उत्तर प्रदेश

देशातील सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात या निवडणुकीतही काँग्रेसचा सुपडासाफ झालाय. धक्कादायक म्हणजे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी स्वतः पिछाडीवर आहेत. अमेठीतून भाजपच्या स्मृती इराणी आघाडीवर आहेत. 2014 मध्ये काँग्रेसने उत्तर प्रदेशात 02 जागा जिंकल्या होत्या. यावेळी रायबरेलीतून सोनिया गांधी आघाडीवर आहेत. इतर एकही उमेदवार आघाडीवर नाही.

महाराष्ट्र

महाराष्ट्रातही काँग्रेसचा सुपडासाफ झाल्याचं दिसतंय. कारण, चंद्रपूर वगळता एकाही ठिकाणी काँग्रेसला आघाडी नाही. स्वतः काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर पराभवाचं संकट आहे. नांदेडमधून भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर आघाडीवर आहेत.

मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान

हिंदी हर्टलँड असलेल्या या तीन राज्यात काँग्रेसने नुकतीच सत्ता मिळवली होती. पण यावेळी सुपडासाफ झाल्याचं चित्र आहे. राजस्थानमध्ये एक, मध्य प्रदेशात एक आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे दोन उमेदवार आघाडीवर आहेत. राजस्थानमध्ये 25, मध्य प्रदेशात 29 आणि छत्तीसगडमध्ये लोकसभेच्या 11 जागा आहेत.

बिहार, झारखंड

उत्तर भारतात बिहार आणि झारखंडमध्येही काँग्रेसची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. झारखंडमध्ये एकेकाळी सर्वात मोठा पक्ष असणाऱ्या काँग्रेस आणि आघाडीला 03 जागांवर आघाडी आहे. तर भाजप 11 जागांवर पुढे आहे. 40 जागा असणाऱ्या बिहारमध्ये काँग्रेस महाआघाडी 02 जागांवर, तर एनडीए 38 जागांवर आघाडीवर आहे.

कर्नाटक

दक्षिण भारतातून काँग्रेसला मोठी अपेक्षा होती. कर्नाटकमध्ये सत्तेत असलेल्या काँग्रेस आणि जेडीएसची अवस्था बिकट झाली आहे. 28 पैकी भाजप 23 आणि काँग्रेस-जेडीएस 04, तर अपक्ष एका जागेवर पुढे आहे.

हिमाचल प्रदेश

केवळ चार जागा असणाऱ्या हिमाचल प्रदेशात काँग्रेसने अनेक वर्षे राज्य केलंय. पण या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा एकही उमेदवार आघाडीवर नाही. भाजप सर्वच्या सर्व जागी आघाडीवर दिसत आहे.

हरियाणा

हरियाणा हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा. पण भाजपची सत्ता आली आणि काँग्रेसला गळती लागली. सध्या कल हाती आलेत त्याप्रमाणे हरियाणात काँग्रेस फक्त एका जागेवर, तर भाजप 09 जागांवर पुढे आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.