मोदींविरोधात वाराणसीत काँग्रेसने तिकीट दिलेले अजय राय कोण आहेत?

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात काँग्रेसकडून वाराणसी मतदारसंघातून मैदानात कोण याचं उत्तर मिळालं आहे. काँग्रेसने प्रियांका गांधी यांच्याऐवजी अजय राय यांना उमेदवारी दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मोदींविरोधात काँग्रेसकडून वाराणसीत प्रियांका गांधी यांना उमेदवारी मिळणार अशी चर्चा होती. मात्र त्यांच्याऐवजी काँग्रेसने अजय राय यांना उमेदवारी दिली. त्यामुळे प्रियंका गांधींच्या निवडणूक लढवण्याच्या शक्यतेला पूर्ण […]

मोदींविरोधात वाराणसीत काँग्रेसने तिकीट दिलेले अजय राय कोण आहेत?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:58 PM

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात काँग्रेसकडून वाराणसी मतदारसंघातून मैदानात कोण याचं उत्तर मिळालं आहे. काँग्रेसने प्रियांका गांधी यांच्याऐवजी अजय राय यांना उमेदवारी दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मोदींविरोधात काँग्रेसकडून वाराणसीत प्रियांका गांधी यांना उमेदवारी मिळणार अशी चर्चा होती. मात्र त्यांच्याऐवजी काँग्रेसने अजय राय यांना उमेदवारी दिली. त्यामुळे प्रियंका गांधींच्या निवडणूक लढवण्याच्या शक्यतेला पूर्ण विराम मिळाला आहे.

कोण आहेत अजय राय?

अजय राय हे 2014 च्या निवडणुकीतही वाराणसीत काँग्रेसचे उमेदवार होते. त्या निवडणुकीत ते तिसऱ्या नंबरवर राहिले.

अजय राय हे उत्तर प्रदेश विधानसभेत पाच वेळा निवडून गेले आहेत.

अजय राय हे भाजपच्या तिकीटावर कोलासला विधानसभा मतदारसंघातून 3 वेळा निवडून गेले.

1996 ते 2007 दरम्यान ते भाजपमध्ये होते.

अजय राय 2009 मधील पोटनिवडणुकीत अपक्ष लढले आणि चौथ्यांदा आमदार झाले.

भाजपने वाराणसी लोकसभा मतदारसंघातून तिकीट न दिल्याने त्यांनी भाजप सोडून समाजवादी पक्षात प्रवेश केला.

त्यावेळी भाजपने मुरली मनोहर जोशी यांना तिकीट दिलं होतं.

2009 मध्ये अजय राय समाजवादी पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढले, मात्र त्यावेळी त्यांचा पराभव झाला.

2012 मध्ये पिंडरा विधानसभा मतदारसंघात त्यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली आणि विजय मिळवला.

2014 मध्ये काँग्रेसकडून वाराणसी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली, त्यांचा पराभव झाला.

2017 मध्ये पिंडरा विधानसभा काँग्रेसकडूनच लढववली, मात्र त्या निवडणुकीतही त्यांचा पराभव झाला.

1994 मध्ये अजय राय यांचे मोठे भाऊ अधवेश राय यांची गोळी मारुन हत्या झाली होती.

2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत अजय राय यांना 75,614 मतं मिळाली होती. त्यावेळी दुसऱ्या स्थानावर अरविंद केजरीवाल होते. केजरीवालांना 2,09,238 मतं मिळाली. तर या मतदारसंघात विजय मिळवलेल्या मोदींना 5.81 लाख मतं मिळाली होती.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.