Breaking | भारत जोडो यात्रेत चालताना खासदाराला हार्ट अटॅक, दुर्दैवी मृत्यू, काँग्रेसमध्ये खळबळ

| Updated on: Jan 14, 2023 | 10:33 AM

भारत जोडो यात्रा अंतिम टप्प्यात असताना काँग्रेस खासदाराच्या अशा दुर्दैवी मृत्यूमुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ माजली आहे.

Breaking | भारत जोडो यात्रेत चालताना खासदाराला हार्ट अटॅक, दुर्दैवी मृत्यू, काँग्रेसमध्ये खळबळ
Image Credit source: social media
Follow us on

नवी दिल्लीः राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेत आज अत्यंत दुर्दैवी घटना घडली. यात्रेत चालताना काँग्रेसचे खासदार संतोष सिंह चौधरी (Santokh Singh Chaudhari) यांना अचानक छातीत दुखू लागले. अस्वस्थ वाटू लागले. आजू-बाजूच्या कार्यकर्त्यांनी त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केलं. संतोष सिंह यांना हार्ट अटॅक आल्याचं निदान डॉक्टरांनी केलं. मात्र पुढील उपचारादरम्यान संतोष सिंह यांचा मृत्यू झाला.

भारत जोडो यात्रा अंतिम टप्प्यात असताना काँग्रेस खासदाराच्या अशा दुर्दैवी मृत्यूमुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ माजली आहे. संतोष सिंह चौधरी यांचा फगवाडा येथील रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ट्विट करून दिली. तसेच त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनीदेखील या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले.

कधी घडली घटना?

या घटनेविषयी अधिक माहिती अशी की, भारत जोडो यात्रा सध्या पंजाबमध्ये आहे. आज लुधियानातील लाडोवाल टोल प्लाझा येथून भारत जोडो यात्रेला सुरुवात झाली. ती फगवाड्याच्या दिशेने जात होती. यात्रेत खासदार संतोष सिंह चौधरी हेदेखील राहुल गांधींच्या जथ्थ्यासोबत चालत होते.

मात्र सकाळी 8.45  वाजेच्या सुमारास संतोष सिंह चौधरी यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांच्या छातीत दुखू लागले. यात्रेतील रुग्णवाहिकेच्या मदतीने त्यांना तत्काळ फगवाडा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. संतोष सिंह चौधरी हे 76 वर्षांचे होते.

भारत जोडो यात्रा तात्पुरती स्थगित

राहुल गांधी यांनी फिल्लोर येथील भट्टिया पर्यंतची यात्रा पूर्ण केली. त्या ठिकाणी काही काळ थांबा घेण्यात आला. मात्र संतोष सिंह यांच्या निधनाचे वृत्त कळताच प्रमुख काँग्रेस नेत्यांसोबत राहुल गांधी रुग्णालायाच्या दिशेने रवाना झाले.  भारत जोडो यात्रा काही काळापुरती स्थगित करण्यात आली आहे.