Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Abhijit Wanjarri | अभिजीत वंजारींनी गडकरींचा मोठा विक्रम मोडला, 18 वर्षातील सर्वाधिक मतं घेत नवा रेकॉर्ड

अभिजित वंजारी यांना या निवडणुकीत 55 हजार 947 मतं पडली. ही मतं गेल्या 18 वर्षातील सर्वाधिक मतं आहेत.

Abhijit Wanjarri | अभिजीत वंजारींनी गडकरींचा मोठा विक्रम मोडला, 18 वर्षातील सर्वाधिक मतं घेत नवा रेकॉर्ड
Follow us
| Updated on: Dec 05, 2020 | 1:37 PM

नागपूर : नागपूर पदवीधर मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत वंजारी (Abhijit Wanjarri Record) यांनी दोन रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत. पहिलं म्हणजे, गेल्या 55 वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघात (Nagpur Graduate Constituency Election) काँग्रेसने झेंडा फडकवला. त्यासोबतच अभिजीत वंजारी यांनी मतांचाही रेकॉर्ड मोडला आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघात अभिजीत वंजारी यांना रेकॉर्डतोड मतं पडली आहेत. मतांच्या बाबतीत त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनाही मागे टाकलं आहे (Abhijit Wanjarri Record).

नागपूर पदवीधर मतदार संघात अभिजीत वंजारी यांनी 55 वर्षांपासूनचा भाजपचा गड काबीज केला. त्यांनी भाजप उमेदवार आणि नागपूरचे महापौर संदीप जोशी (Sandeep Joshi) यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. अभिजीत वंजारी यांना या निवडणुकीत 55 हजार 947 मतं पडली. ही मतं गेल्या 18 वर्षातील सर्वाधिक मतं आहेत.

2008 च्या निवडणुकांमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना 52 हजार 761 मतं प्राप्त झाली होती. मात्र, यंदा अभिजीत वंजारी यांनी प्रथम पसंतीमध्ये 55 हजार 947 मतं मिळवली आहे. ही मतं गेल्या 18 वर्षातील सर्वाधिक मतं आहेत. 2014 मध्ये भाजप चे अनिल सोले यांनी 52 हजार 484 मतं घेतली होती. त्या निवडणुकीत त्यांचा विजय झाला होता (Abhijit Vanjari Record).

कोण आहेत अभिजीत वंजारी ?

  • अभिजीत वंजारी हे नागपूर पदवीधर मतदार संघातून विजयी झाले आहेत
  • अभिजीत वंजारी हे नागपूर पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर महाविकास आघाडीतर्फे रिंगणात उतरले होते
  • वंजारी हे विदर्भातील काँग्रेसचे निष्ठावान नेते मानले जातात.
  • अभिजीत वंजारी यांची नागपूर पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची आधीपासूनच तयारी होती
  • उमेदवारीच्या शर्यतीत वंजारी अग्रेसर, मार्चपासूनच मतदारांशी संपर्क

Abhijit Wanjarri Record

संबंधित बातम्या :

पुणे आणि नागपूर पदवीधरमध्ये भाजपला मोठा धक्का!, हिंमत असेल तर एकटे लढा, चंद्रकांत पाटलांचं सत्ताधाऱ्यांना आव्हान

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.