बॉलिवूडचे लचके तोडण्याची पटकथा तयार; अशोक चव्हाणांची भाजपवर खोचक टीका

भाजपच्या काळात जे झाले ते आम्ही पुन्हा घडू देणार नाही, असा इशाराही अशोक चव्हाण यांनी दिला. (Ashok Chavan on Parallel Bollywood Industry in UP)

बॉलिवूडचे लचके तोडण्याची पटकथा तयार; अशोक चव्हाणांची भाजपवर खोचक टीका
Follow us
| Updated on: Dec 01, 2020 | 4:12 PM

मुंबई : “भाजपच्या 5 वर्षाच्या काळात दिवसाढवळ्या महाराष्ट्रातील अनेक उद्योग अन् कार्यालये गुजरातला पळवण्यात आली. आता महाराष्ट्रातील सरकार बदलले तर उत्तरप्रदेश सरकारच्या नावाखाली बॉलिवूडचे लचके तोडण्याची पटकथा तयार झालेली दिसते,” अशी खोचक टीका काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी दिली. पण भाजपच्या काळात जे झाले ते आम्ही पुन्हा घडू देणार नाही, असा इशाराही अशोक चव्हाण यांनी दिला. (Ashok Chavan on Parallel Bollywood Industry in UP)

बॉलिवूड उत्तर प्रदेशात हलविण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. यावरुन राजकारण रंगत असताना नुकतंच त्यावर अशोक चव्हाण यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली.

“भाजपच्या 5 वर्षाच्या काळात दिवसाढवळ्या महाराष्ट्रातील अनेक उद्योग अन् कार्यालये गुजरातला पळवण्यात आली. आता महाराष्ट्रातील सरकार बदलले तर उत्तरप्रदेश सरकारच्या नावाखाली बॉलीवूडचे लचके तोडण्याची पटकथा तयार झालेली दिसते. पण भाजपच्या काळात जे झाले ते आम्ही पुन्हा घडू देणार नाही,” असे अशोक चव्हाण म्हणाले.

“मागील 5 वर्ष नियोजनबद्ध पद्धतीने महाराष्ट्राचे आर्थिक आणि औद्योगिक महत्व कमी केले जात असताना भाजपचे तत्कालीन राज्य सरकार अन् नेते गप्प होते. सरकार गेल्यानंतरही वरिष्ठांची मर्जी राखण्यासाठी त्यांनी कोरोनासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीऐवजी पीएम केअर्सला पैसे देण्यासाठी पुढाकार घेतला,” असा टोलाही अशोक चव्हाण यांनी लगावला.

“देशातील सर्व राज्यांची प्रगती झाली पाहिजे आणि त्यासाठी केंद्र व सर्व राज्यांनी एकमेकांना सहकार्य केले पाहिजे, याबाबत दूमत नाही. पण ताकदीच्या बळावर दुसऱ्याच्या ताटातील घास हिसकावून पोट भरणे योग्य नाही. या पापात महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी सहभागी होऊन महाराष्ट्राशी द्रोह करू नये,” असा सल्ला अशोक चव्हाणांनी दिला.

(Ashok Chavan on Parallel Bollywood Industry in UP)

योगी आदित्यनाथ यांचा दौरा 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उद्या (2 डिसेंबर) रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. योगी आदित्यनाथ 1 डिसेंबर रोजी मुंबईला येण्यासाठी उत्तर प्रदेशमधून रवाना होतील. ते 1 डिसेंबरच्या रात्री मुंबईत पोहोचतील. त्यानंतर 2 डिसेंबर रोजी ते मुंबई शेअर बाजाराला भेट देतील. यावेळी योगी त्यांच्या दौऱ्यात महाराष्ट्रातील उद्योगपती, तसेच बॉलिवूड निर्मात्यांसोबत बैठक घेतील. या बैठकीत उद्योगपती तसेच बॉलिवूड निर्मात्यांना उत्तर प्रदेशात गुंतवणूक करण्याचे  ते आवाहन करतील. रतन टाटा, आदित्य बिरला असे बडे उद्योगपती या बैठकीत सहभागी होतील. (Ashok Chavan on Parallel Bollywood Industry in UP)

संबंधित बातम्या : 

कितीही प्रयत्न केले तरी बॉलिवूड वेगळं केलं जाणार नाही; सुप्रिया सुळेंचा इशारा

बॉलिवूड मुंबईतून कोणीही नेऊ शकत नाही, योगी आदित्यनाथ अभ्यासासाठी येत असावेत : चंद्रकांत पाटील

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.