महाविकास आघाडी सरकारकडे बहुमत असल्याचा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा दावा
ठाकरे सरकारकडे बहुमत आहे. सरकार म्हणून आम्ही आजही कार्यरत असून कायद्याची लढाई लढण्यासाठी दिल्लीच्या विशेष लीगल टीमचीही मदत घेतली जात आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
मुंबई : महाराष्ट्राचा सत्ता संघर्ष चांगलाच पेटला आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde )गटाने महाविकास आघाडीला थेट चॅलेंज दिले आहे. अशा परिस्थितीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेलेल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत. महाविकास आघाडी सरकारकडे(Mahavikas Aghadi government) बहुमत असल्याचा दावा करत आता कायदेशीर लढाई लढणार असल्याचे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगीतले. राजकीय पेच सोडवण्यासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेलेल शिवसेने, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या बैठकांचा सिलसिला सुरु आहे. शिवसेनेच्या कार्यकारीणीची बैठक चर्चेत असतानाच काँग्रेसची बैठक देखील आज पार पडली. या बैठकीनंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Congress leader Balasaheb Thorat) यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
महाविकास आघाडीची लिगल टिमही कार्यरत झालेय
या बैठकीत राजकिय परिस्थितीवर चर्चा झाली. सरकार म्हणून आम्ही अजूनही कार्यरत असल्याचे थोरात म्हणाले. सध्या घटनात्मक पेचावर कायद्याची लढाई सुरु आहे. याकरिता महाविकास आघाडीची लिगल टिमही कार्यरत झाल्याचे थोरात म्हणाले. काँग्रेसच्या या बैठकीत हंगामी अध्यक्षपदाबद्दल कोणतीही चर्चा झाली नसल्याचे थोरात यांनी सांगीतले.
सरकार म्हणून आम्ही आजही कार्यरत
ठाकरे सरकारकडे बहुमत आहे. सरकार म्हणून आम्ही आजही कार्यरत असून कायद्याची लढाई लढण्यासाठी दिल्लीच्या विशेष लीगल टीमचीही मदत घेतली जात असल्याचे थोरातांनी सांगीतले.
महाविकास आघडीत फूट पाडण्याच डाव यशस्वी होणार नाही
आमची कायदेशीर बाजू देखील भक्कक आहे. सरकार अडचणीत आले पाहिजे. यासाठी राज्यात काही तरी वेगळी स्थिती निर्माण झालेय हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र, कितीही प्रयत्न केला तरी महाविकास आघडीत फूट पाडण्याच डाव यशस्वी होणार नाही असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला.