Digvijay Singh : देशात लोकतंत्र नाही तर धनतंत्र; सर्व खेळ पैशांच्या जोरावर, दिग्विजय सिंहांचा भाजपाला टोला

काँग्रेसचे नेते आणि सरचिटणीस दिग्विजय सिंह (Digvijay Singh) यांनी पत्रकार परिषदेमध्ये भाजपावर (BJP) जोरदार निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात आता जो खेळ झाला तो देशाला नवा नाही. 2017 पासून हे पैशांच्या जोरावर सुरू असल्याचे द्विग्विजय सिंह यांनी म्हटले आहे.

Digvijay Singh : देशात लोकतंत्र नाही तर धनतंत्र; सर्व खेळ पैशांच्या जोरावर, दिग्विजय सिंहांचा भाजपाला टोला
Follow us
| Updated on: Jul 11, 2022 | 6:55 AM

मुंबई : काँग्रेसचे नेते आणि सरचिटणीस दिग्विजय सिंह (Digvijay Singh) यांनी पत्रकार परिषदेमध्ये भाजपावर (BJP) जोरदार निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात आता जो खेळ झाला तो देशाला नवा नाही.  2017 पासून हे पैशांच्या जोरावर सुरू असल्याचे द्विग्विजय सिंह यांनी म्हटले आहे. भाजपाचा लोकशाही(Democracy) आणि भारतीय संविधानावर विश्वास नाही. महाराष्ट्रात पक्षांतर बंदी कायद्याच्या चिंधड्या उडवल्या गेल्या. धर्माचा वापर हा राजकीय हत्यार म्हणून केला जात आहे. भारताचा तिरंगा हा खादीच्या कापडापासूनच तयार केला जातो. आता मात्र चीनमधून तिरंग्यासाठी कापड आयात करून त्यापासून तिरंगा तयार करण्यात येणार आहे. ज्या -ज्या राज्यांमध्ये विरोधी पक्षाचे सरकार आहे, त्यांच्यासोबत पूर्णत: पक्षपात केला जात असून, देशात आता लोकतंत्र नाही तर धनतंत्र आल्याची टीका दिग्विजय सिंह यांनी केली  आहे. तसेच त्यांनी यावेळी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री करण्याच्या भाजपाच्या निर्णयावर देखील प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाले दिग्विजय सिंह

दिग्विजय सिंह यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. तसेच अनेक गंभीर आरोप देखील केले आहेत. देशात सध्या लोकतंत्र नसून धनतंत्र आहे. फोडाफोडीचे राजाकराण सुरू आहे. महाराष्ट्राने आता जो खेळ पाहिला तो आताचा नाही तर त्याची सुरुवात ही 2017 पासून झाली आहे. हे सर्व पैशांचे खेळ आहे. राज्यात पक्षांतर बंदी कायद्याच्या चिंधड्या उडवल्या गेल्या. धर्मचा वापर हा राजकीय हत्यार म्हणून सुरू आहे. गोव्यामध्ये काँग्रेसचे जे नेते भाजपासोबत गेले, त्यांच्यापैकी किती जणांच्या मागे ईडीची चौकशी सुरू होती याची माहिती घ्यावी लागेल असे म्हणात त्यांनी भाजपाला टोला लगावला आहे.

हे सुद्धा वाचा

…हा तर फडणवीसांचा अपमान

राज्यामध्ये काही दिवसांपूर्वीच नवे सरकार आले आहे. सर्वांना वाटत होते की देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील. मात्र भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने सर्वांनाच अनअपेक्षीत धक्का दिला आणि एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली यावरून देखील द्विग्विजय सिंह यांनी टोला लगावला आहे.देवेंद्र फडणवीस यांना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने जाणून बुजून उपमुख्यमंत्रीपद देत अपमानित केलं आहे. त्यांच्या जागी मी असतो तर हे पद कधीच घेतले नसते असं द्विग्विजय सिंह यांनी म्हटले आहे.

मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.