फडणवीस आणि माझी दुश्मनी थोडीचंय, भेटीत राजकीय चर्चा नाही, काँग्रेसच्या महागाईविरोधातील आंदोलनात मी सहभागी होतोय- अशोक चव्हाण

आपण काँग्रेसमध्येच असल्याचंही चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे. आज काँग्रेसचं महागाईविरोधात दिल्लीत आंदोलन होतंय. त्यात ते सहभागी होणार आहेत.

फडणवीस आणि माझी दुश्मनी थोडीचंय, भेटीत राजकीय चर्चा नाही, काँग्रेसच्या महागाईविरोधातील आंदोलनात मी सहभागी होतोय- अशोक चव्हाण
Follow us
| Updated on: Sep 03, 2022 | 11:42 AM

मुंबई : सध्या गणेशोत्सव साजरा केला जात आहे. त्याची धामधूम सगळीकडे दिसतेय. तसंच राजकीय घडामोडींनीही वेग घेतलाय. अश्यात आता भेटीगाठी वाढल्या आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात भेट झाली. त्यानंतर चव्हाण त्यांच्या समर्थक आमदारांसह भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. यावर आता खुद्द अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनीच प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस आणि माझी भेट झाली पण आमच्यात राजकीय चर्चा झाली नाही, असं अशोक चव्हाण म्हणालेत.

देवेंद्र फडणवीस जरी दुसऱ्या पक्षात असले तरी त्यांची आणि माझी दुश्मनी थोडीच आहे तेव्हा… आम्ही चांगले मित्र आहोत, असं म्हणत अशोक चव्हाण यांनी फडणवीसांसोबतच्या मैत्रीवर भाष्य केलं आहे.

हे सुद्धा वाचा

ती गुप्त भेट

अशोक चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात काल भेट झाली. ही गुप्त भेट आता उघड झाली आहे. अशोक चव्हाण भाजपचे प्रवक्ते आशिष कुलकर्णी यांच्या घरी गणपती दर्शनासाठी गेले होते. तिथेच देवेंद्र फडणवीसही गणपतीच्या दर्शनासाठी आले होते. दोन्ही नेते एकमेकांच्या समोरासमोर आले. त्यांच्यात भेट झाली. तिथे त्यांच्यात काहीवेळ भेट झाली. त्यांच्यात झालेली भेट सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे. अशोक चव्हाण काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाणार असल्याचं बोललं जात आहे.

भेटीत काय झालं?

देवेंद्र फडणवीसांसोबत माझी भेट झाली. पण या भेटीत राजकीय चर्चा नाही. आम्ही खासगी विषयांवर बोललो, असं अशोल चव्हाण म्हणाले आहेत.

आपण काँग्रेसमध्येच असल्याचंही चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे. आज काँग्रेसचं महागाईविरोधात दिल्लीत आंदोलन होतंय. त्यात ते सहभागी होणार आहेत. “काँग्रेसच्या महागाईविरोधातील आंदोलनात मी सहभागी होतोय”, असं अशोक चव्हाण म्हणालेत.

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...