सोलापूर, माढ्यात भाजपची ताकद आणखी वाढली, काँग्रेस नेत्याचा भाजपप्रवेश

पंढरपूर : भाजपकडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीला धक्के देणं सुरुच आहे. सोलापूर जिल्ह्यातील दोन मतदारसंघांमध्ये (सोलापूर, माढा) प्रभाव असणारे काँग्रेस नेते कल्याण काळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांचे विश्वासू म्हणून कल्याण काळे यांची ओळख आहे. शिंदे हे स्वतः काँग्रेसकडून सोलापूरचे उमेदवार आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या […]

सोलापूर, माढ्यात भाजपची ताकद आणखी वाढली, काँग्रेस नेत्याचा भाजपप्रवेश
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:04 PM

पंढरपूर : भाजपकडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीला धक्के देणं सुरुच आहे. सोलापूर जिल्ह्यातील दोन मतदारसंघांमध्ये (सोलापूर, माढा) प्रभाव असणारे काँग्रेस नेते कल्याण काळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांचे विश्वासू म्हणून कल्याण काळे यांची ओळख आहे. शिंदे हे स्वतः काँग्रेसकडून सोलापूरचे उमेदवार आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला आणखी एक धक्का बसलाय.

कल्याण काळे यांच्या भाजप प्रवेशामुळे राष्ट्रवादीचे माढ्याचे उमेदवार संजय शिंदे आणि सोलापूरचे उमेदवार सुशील कुमार शिंदे यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. सोलापुरात भाजपकडून डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी आणि माढ्यात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. माढ्यात कल्याण काळे यांच्यामुळे भाजपची स्थिती आणखी मजबूत झाली आहे.

कोण आहेत कल्याण काळे?

भाळवणी येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याचे अध्यक्ष

सिताराम महाराज साखर कारखान्याचे संस्थापक

श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष

सोलापूर जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष

सोलापूर जिल्हा सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष

राज्य सहकारी साखर संघाचे माजी उपाध्यक्ष

माढा, पंढरपूर आणि सांगोला विधानसभा मतदारसंघात मोठा जनाधार

राजकारणाबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, बँकिंग, आरोग्य क्षेत्रातही मोठं काम

सोलापूर, माढ्यात आतापर्यंत आघाडीला भाजपचे धक्के

लोकसभेपूर्वी सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात भाजपने काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीला मोठे धक्के दिले आहेत. 2014 ला मोदी लाटेतही निवडून आलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपात प्रवेश केला. हा सर्वात मोठा धक्का राष्ट्रवादीला बसला. त्यांच्यानंतर वडील विजयसिंह मोहिते पाटलांनीही भाजपचं काम करणार असल्याचं जाहीर केलं. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शेकडो पदाधिकाऱ्यांसह मोहिते कुटुंबाने भाजपचा हात धरला. दुसरीकडे काँग्रेसलाही धक्का देत भाजपने फलटणचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना आपल्या गोटात घेण्यात यश मिळवलं. निंबाळकरांना माढ्यातून भाजपने उमेदवारी दिली आहे.

2014 ला सुशील कुमार शिंदेंना सोलापुरातून पराभव स्वीकारावा लागला होता. पुन्हा एकदा ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एकीकडे त्यांच्यासमोर वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांचं आव्हान आहे, तर भाजपनेही सोलापूर जिल्ह्यातील दोन्ही जागा जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यासारखे बडे नेते सोलापूर जिल्ह्यात तळ ठोकून आहेत.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.