Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Satej Patil : “पावसासुळे अस्मानी संकट, राज्याला किमान मदत आणि पुनर्वसनमंत्री तरी द्या”, सतेज पाटलांची मागणी

Eknath Shinde : मंत्रिमंडळ विस्तारावरून सतेज पाटलांचे शिंदे सरकारला सवाल

Satej Patil : पावसासुळे अस्मानी संकट, राज्याला किमान मदत आणि पुनर्वसनमंत्री तरी द्या, सतेज पाटलांची मागणी
Follow us
| Updated on: Jul 22, 2022 | 12:53 PM

कोल्हापूर : सध्या राज्यात नवं सरकार आलंय. पण अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) या दोघांमध्येच बैठका होतात आणि निर्णय घेतले जातात. त्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. राज्यातील विविध प्रश्न प्रलंबित असताना मंत्रिमंडळ विस्तार का केला जात नाही, असं सवाल विचारला जातोय. माजी मंत्री आणि आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी शिंदे सरकारला प्रश्न विचारलेत. “सध्या सर्वत्र मुबलक प्रमाणात पाऊस होतोय. काही ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अश्या संकटकाळात राज्याला किमान मदत आणि पुनर्वसन मंत्री तरी द्या. कुणाला किती मंत्रिपद मिळणार याची माहिती नाही. सरकार संकटकाळात कुठं मदत करतंय, असं दिसतं नाही. सरकार सगळंसावरल्यानंतर केवळ पंचनामे पाहायला येणार आहे का?”, असं सतेज पाटील म्हणालेत.

देशात सूडाचं राजकारण सुरू- पाटील

सोनिया गांधी यांची काल ईडी चौकशी झाली त्यावरही सतेज पाटलांनी भाष्य केलंय. देशात कधीच असं सूडाचं राजकारण केले नाही. विरोधी पक्षांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातो. काँग्रेसने भारत जोडो अभियान सुरू केलं आहे, त्यानंतर लगेच कारवाई सुरू झाली.अशा दबावाला काँग्रेस कधीही बळी पडणार नाही. राष्ट्रपती निवडणुकीत शरद पवार यांनी विरोधी पक्षाची मोट बांधायचा प्रयत्न केला म्हणून राष्ट्रवादीलाही टार्गेट केले जातंय, अश्या गोष्टींना आम्ही घाबरणार नाही.

हे सुद्धा वाचा

शंभूराजे देसाई असू किंवा मी असू हे निर्णय घेत नाही.एसआयडीचा रिपोर्ट आल्यानंतर तशी सुरक्षा दिली जाते. मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री कोणताही हस्तक्षेप करत नाही. मुख्य सचिवांच्या अंतर्गत ही समिती असते. रिपोर्ट पाहिला जातो आणि मग त्याबाबत निर्णय घेतला जातो. उद्धव ठाकरे यांच्याकडून अशी कोणतीही सूचना आली असेल यात तथ्य वाटत नाही. उलट एकनाथ शिंदे त्यावेळी गडचिरोलीचे पालकमंत्री होते त्यांना जास्त सुरक्षा होती, असं म्हणत त्यांनी सुहास कांदे यांच्या विधानावलर भाष्य केलंय.

अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली.
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी.
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर.
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट.