आधी म्हणाले रोजगाराचे पैसे खात्यात टाका, आता वीकेंड लॉकडाऊनवर पृथ्वीराज चव्हाण म्हणतात…

वीकेंड लॉकडाऊनचा हा निर्णय सर्वसामान्यांना दिलासादायक असल्याचे मत पृथ्वीराज चव्हाणांनी व्यक्त केले. (Prithviraj Chavan Congratulates Uddhav Thackeray)

आधी म्हणाले रोजगाराचे पैसे खात्यात टाका, आता वीकेंड लॉकडाऊनवर पृथ्वीराज चव्हाण म्हणतात...
पृथ्वीराज चव्हाण, उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Apr 05, 2021 | 2:17 PM

कराड (सातारा) : काँग्रेसचे दिग्गज नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचं अभिनंदन केलं. उद्धव ठाकरे यांनी वीकेंड लॉकडाऊनबाबत घेतलेला निर्णय सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक आहे, असे मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. (Congress leader Prithviraj Chavan Congratulates CM Uddhav Thackeray for Weekend Lockdown)

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी वीकेंड लॉकडाऊन लावण्याचा घेतलेला निर्णय सर्वांशी सल्लामसलत करुन घेतला आहे. या निर्णयामुळे सामान्य नागरिकांचे हाल होणार नाहीत. हा निर्णय सर्वसामान्यांना दिलासादायक असल्याचे मत चव्हाणांनी व्यक्त केले. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडच्या वेणूताई उपजिल्हा रुग्णालयात कोरोना प्रतिबंध लस घेतली.

पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले होते?

राज्यात लॉकडाऊन करायचा की नाही याबाबत सत्ताधाऱ्यांमध्ये मत-मतांतरं असल्याचं म्हटलं जात होतं. त्यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठं विधान केलं होतं. आधी रोजगाराचे पैसे थेट खात्यावर जमा करा, मग लॉकडाऊनचं बघा, असा सल्ला पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सरकारला दिला होता. तसेच चव्हाण यांनी ठाकरे सरकारकडे पाच मागण्याही केल्या होत्या.

“एप्रिल हा काळजी घेणारा महिना”

“केंद्राने हाफकिनला कोरोना लस उत्पादनासाठी परवानगी द्यावी. भारत बायोटेकने साधन सामुग्री आणि लसीचं टेक्नीक पुरवावं. केंद्राने अजून परवानगी दिली नाही, ती तातडीने द्यावी. लॉकडाऊन झाल्यावर सर्वसामान्यांवर नुकसान सहन करण्याची वेळ येईल. साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय, पण तो स्वीकारणे नुकसानीचं आहे. एप्रिल हा काळजी घेणारा महिना आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावं, गर्दी करु नये, मास्क वापरावं आणि प्रशासनाला मोठा निर्णय घेण्यासाठी भाग पाडू नये.” असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते.

‘लॉकडाऊन करु नये, केला तर परदेशाप्रमाणे थेट नागरिकांच्या बँक खात्यात पैसे टाकावे’

“पहिल्या टप्प्याने खूप नुकसान झालंय. दुसऱ्यानेही होईल. त्यामुळे याबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी. शासनाने काही उपाययोजना केल्या आहेत, तर काही केल्या नाहीत. लॉकडाऊन करु नये, जर केला तर परदेशाप्रमाणे थेट नागरिकांच्या बँक खात्यात पैसे टाकावे. लॉकडाऊन केलंच तर अर्थव्यवस्थेला फटका बसणार नाही याकडे लक्ष द्यायला हवं. लॉकडाऊन कुणाला मजा येते म्हणून नाही, जीव वाचवण्यासाठी असतो. जीव की रोजगार हा प्रश्न असतो, पण जीव महत्त्वाचा असतो. लॉकडाऊन करायचा असेल, तर पूर्वसूचना द्यायला हवी,” असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी नमूद केलं होतं.

संबंधित बातम्या :

पाकिस्तानसोबत युद्ध झालं तर वर्गणी काढणार का? कोरोना हे युद्धच, सरकारने खात्यात पैसे टाकावेत : पृथ्वीराज चव्हाण

आधी रोजगाराचे पैसे थेट खात्यावर जमा करा, मग लॉकडाऊनचं बघा, पृथ्वीराज चव्हाणांच्या ठाकरे सरकारकडे 5 मागण्या

(Congress leader Prithviraj Chavan Congratulates CM Uddhav Thackeray for Weekend Lockdown)

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.