युझर्सचा डेटा परदेशी कंपन्यांना पाठवणारे ‘नमो’ अॅप बंद करा, पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी
भारत-चीन सीमारेषा भागातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारकडून चीनच्या 59 अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे (Prithviraj Chavan demands to ban NaMo App)
मुंबई : परस्पर खाजगी सेटिंग बदलणारे आणि वापरकर्त्यांचा डेटा परदेशातील कंपन्यांना पाठवणारे ‘नमो’ अॅप बंद केले पाहिजे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. (Prithviraj Chavan demands to ban NaMo App)
“130 कोटी भारतीयांची खाजगी माहिती धोक्यात आहे, म्हणून सरकारने 59 मोबाईल अॅपवर बंदी घातली. याच निकषावर वापरकर्त्यांची माहिती गोळा करणारे, परस्पर खाजगी सेटिंग बदलणारे आणि वापरकर्त्यांचा डेटा भारताबाहेर परदेशातील कंपन्यांना पाठवणारे NaMo अॅप देखील बंद केले पाहिजे” असे ट्वीट पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे.
१३० कोटी भारतीयांची खाजगी माहिती धोक्यात आहे म्हणून सरकारने ५९ मोबाईल अॅपवर बंदी घातली. याच निकषावर वापरकर्त्यांची माहिती गोळा करणारे, परस्पर खाजगी सेटिंग बदलणारे आणि वापरकर्त्यांचा डेटा भारताबाहेर परदेशातील कंपन्यांना पाठवणारे NaMo अॅप देखील बंद केले पाहिजे. #BanNaMoApp
— Prithviraj Chavan (@prithvrj) June 30, 2020
हेही वाचा : चीनच्या पंतप्रधानांना मोदी 19 वेळा भेटले, काय निष्पन्न झाले? : पृथ्वीराज चव्हाण
भारत-चीन सीमारेषा भागातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारकडून चीनच्या 59 अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. टिक टॉक, शेअर इट, हॅलो, यूसी ब्राऊझर यासारख्या अनेक अॅप्लिकेशनचा यात समावेश आहे.
भारतीय सार्वभौमत्व, संरक्षण, एकात्मतेबद्दल पूर्वग्रह दूषित असल्याचा ठपका ठेवत केंद्र सरकारने याबाबतचे कठोर पाऊल उचलले आहे. डेटा आणि गोपनीयता समस्यांमुळे भारत सरकारने हे पाऊल उचललं असल्याचे बोललं जात आहे.
भारताकडून चीनच्या ‘या’ अॅपवर बंदी
- TikTok
- Shareit
- Kwai
- UC Browser
- Baidu map
- Shein
- Clash of Kings
- DU battery saver
- Helo
- Likee
- YouCam makeup
- Mi Community
- CM Browers
- Virus Cleaner
- APUS Browser
- ROMWE
- Club Factory
- Newsdog
- Beutry Plus
- UC News
- QQ Mail
- Xender
- QQ Music
- QQ Newsfeed
- Bigo Live
- SelfieCity
- Mail Master
- Parallel Space
- Mi Video Call Xiaomi
- WeSync
- ES File Explorer
- Viva Video QU Video Inc
- Meitu
- Vigo Video
- New Video Status
- DU Recorder
- Vault- Hide
- Cache Cleaner DU App studio
- DU Cleaner
- DU Browser
- Hago Play With New Friends
- Cam Scanner
- Clean Master Cheetah Mobile
- Wonder Camera
- Photo Wonder
- QQ Player
- We Meet
- Sweet Selfie
- Baidu Translate
- Vmate
- QQ International
- QQ Security Center
- QQ Launcher
- U Video
- V fly Status Video
- Mobile Legends
- DU Privacy
अॅपचा अब्जावधी डॉलर्सचा बाजार आणि भारत
⦁ भारत जगातील वेगानं वाढणारा मोबाईल बाजार ⦁ भारतात सध्या अॅपचे 161 दशलक्ष वापरकर्ते ⦁ 2019 या एकाच वर्षात भारतीयांनी 19 अब्ज अॅप डाऊनलोड केले. ⦁ भारतीय अॅप बाजाराचा विस्तार 190% अशा प्रचंड वेगानं होतोय, तर चीनचा 80% वेगानं ⦁ भारतीयांनी अॅपच्या माध्यमातून केलेला खर्च 120 दशलक्ष डॉलर्सचा ⦁ 2020 मध्ये अॅप उत्पादकांना 267 दशलक्ष डॉलर्स उत्पन्नाची शक्यता ⦁ 2024 पर्यंत हेच उत्पन्न 369 दशलक्ष डॉलर्सवर पोहचण्याचा अंदाज
अॅप बंदीचा चीनला कसा फटका?
⦁ चीनच्या 59 अॅपवर बंदी आल्यानं त्यांच्यापासून सर्वाधिक वेगानं वाढणारा बाजार दुरावणार ⦁ चीनपेक्षाही दुप्पट वेगानं वाढणारा ग्राहकवर्गापासून चीनी कंपन्या वंचित राहणार ⦁ चीनी कंपन्यांच्या उत्पन्नावर स्वाभाविकच दुष्परिणाम होणार
(Prithviraj Chavan demands to ban NaMo App)