पदाची मर्यादा राखा, केंद्रीय मंत्र्याला हे शोभतं का? पृथ्वीराज चव्हाण गोयलांवर कडाडले
गोयल यांनी पदाची मर्यादा तरी राखली पाहिजे, केंद्रीय मंत्र्याला हे शोभतं का?" असे पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan Press Conference) म्हणाले.
मुंबई : महाराष्ट्र सरकार आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यामध्ये रंगलेलं ट्विटर युद्ध चांगलंच (Prithviraj Chavan Press Conference) पेटलं आहे. त्यात आता माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही उडी घेतली आहे. “रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी पदाची मर्यादा तरी राखली पाहिजे, केंद्रीय मंत्र्याला हे शोभतं का?” असा सल्ला पृथ्वीराज चव्हाण यांनी रेल्वेमंत्र्यांना दिला.
“पियुष गोयल यांनी पदाची मर्यादा तरी राखली पाहिजे. ते ट्विटवरुन उत्तर देतात. हे केंद्रीय मंत्र्याला शोभते का? केंद्रीय मंत्र्यांनं कसं वागलं पाहिजे. एकमेकांना दोष द्यायचा तर केंद्राचेही अनेक दोष आहेत,” असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. उत्तरप्रदेशातील मुख्यमंत्र्यांना रोजगार निर्माण करता आला नाही, म्हणून हे लोक महाराष्ट्रात आले, अशी टीकाही त्यांनी केली.
…म्हणून मजूर महाराष्ट्रात आले
“उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अशी भाषा करु नये. त्यांना रोजगार निर्माण करता आला नाही म्हणून हे लोक महाराष्ट्रात आले. त्यांची राज्यात काळजी घेतली गेली. पण असं आरोप करुन उत्तर मिळणार नाही,” असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. (Prithviraj Chavan Press Conference)
“मी सरकारवर नाराज नाही. माझी ऑडियो क्लिप मला माहिती नाही. त्यामुळे मला त्यावर जास्त काही बोलायचे नाही,” असेही स्पष्टीकरण कथित ऑडिओ क्लिपप्रकरणी पृथ्वीराज चव्हाणांनी दिले.
हेही वाचा – Twitter War | पियुषजी, राज्यसभेत आपण महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताय विसरु नका : संजय राऊत
“माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजेटवर पुस्तक लिहिलं आहे. त्यांना याबाबत अधिक माहिती आहे की राज्य सरकार कधीही पॅकेज देत नाही. केंद्र सरकार देत असतं. राजकारणासाठी मागणी करत असाल, तर ठीक आहे. उद्या म्हणाल की मुंबई महापालिका आणि नागपूर महापालिकेने काय पॅकेज जाहीर केलं,” असा टोलाही पृथ्वीराज चव्हाणांनी लगावला.
मोदींचं पॅकेज एक जुमला
“पंतप्रधान मोदी सरकारने जाहीर केलेलं पॅकेज हा एक जुमला आहे. देशात प्रत्येक पंतप्रधान यांनी फार मोठे बदल केले त्यांची एक वेगळी ओळख आहे. मोदींनी आत्मनिर्भरतेचा शोध लावण हे दुर्देव आहे. भारतात आर्थिक मंदीचं जागतिक पातळीवर भाकीत केलं आहे. मोदींनी 20 लाख कोटींची घोषणा केली होती तेव्हा आम्ही त्याचं स्वागत केलं होतं. पण अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी पाच दिवस प्रदीर्घ प्रेस घेतली. त्यात आमची निराशा झाली.”
“त्यात कोणतीही मदत नाही तर फक्त कर्ज आहे. 20 लाख कोटींपैकी फक्त 2 लाख कोटी खर्च होणार आहे. बाकी सर्व कर्ज घेण्याचा सल्ला दिला आहे. त्याशिवाय तोट्यात गेलेल्या उद्योगांना बँका कर्ज देणार नाही. ही कर्ज घेतली की ती परत होणार नाही आणि पुन्हा त्याला माफ करावा लागेल. सरकारने थेट अनुदान दिलं पाहिजे. कोरोनाच्या लढाईत सरकार कमी पडलं आहे. खोदा पहाड और अशी अवस्था निर्मला सीतारमन यांची झाली आहे. सरकारला किती ही कर्ज काढावे लागले, नोटा छापाव्या लागल्या तरी अर्थचक्र थांबता कामा नये,” असाही सल्ला पृथ्वीराज चव्हाण यांनी (Prithviraj Chavan Press Conference) दिला.
संबंधित बातम्या :
पियुष गोयल यांनी यादी मागितली; संजय राऊत म्हणाले, यादी घ्या पण रेल्वे योग्य स्टेशनला पोहोचवा