“…म्हणून मोदी मणिपूरला जात नाही”, राहुल गांधींचा आरोप, म्हणाले “भाजपच्या लोकांनी तिकडे…”

"त्यांना जातीची चौकट राहिली पाहिजे असं वाटतं. त्यांना द्वेष पसरवायचा आहे. हिंसा भडकवायचे आहे. एका धर्माला दुसऱ्याच्या बद्दल भडकवत आहेत", अशी टीका राहुल गांधींनी केली.

...म्हणून मोदी मणिपूरला जात नाही, राहुल गांधींचा आरोप, म्हणाले भाजपच्या लोकांनी तिकडे...
Follow us
| Updated on: Sep 05, 2024 | 4:24 PM

गेल्या वर्षभरापासून मणिपूरमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. त्यामुळे तेथे कायम तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे. हिंसाचाराच्या घटनांमध्ये अनेक लोकांचा मृत्यूही झाला होता. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्करालाही पाचारण करण्यात आलं होतं. आता या ठिकाणची परिस्थिती हळूहळू नियंत्रणात आणि पूर्वपदावर येत आहे. आता या मुद्द्यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी हे आक्रमक झाले आहेत.

राहुल गांधी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी सांगलीत जोरदार भाषण केले. या भाषणावेळी राहुल गांधींनी मणिपूरच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. “त्यांना जातीची चौकट राहिली पाहिजे असं वाटतं. त्यांना द्वेष पसरवायचा आहे. हिंसा भडकवायचे आहे. एका धर्माला दुसऱ्याच्या बद्दल भडकवत आहेत”, अशी टीका राहुल गांधींनी केली.

“मलाही तोच आनंद होतो”

“मी खरगेंना म्हटलं मी तुमच्यासोबत कर्नाटकात जातो तुम्ही आनंदी होता. विमानातून उतरताच तुमच्या चेहऱ्यावर हास्य असतं. पण तुम्ही महाराष्ट्रात आल्यावर अधिक खूश होता. तुमच्या चेहऱ्यावर हास्य असते. ते म्हणाले, राहुल महाराष्ट्रात काँग्रेसची विचारधारा रुजलेली आहे. त्यामुळे मी आल्यावर मला आनंद होतो. या ठिकाणी काँग्रेस, फुले, शाहू, शिवाजी महाराज आणि आंबेडकरांची विचारधारा आहे. त्यामुळे इथे आल्यावर जेवढा आनंद होतो, तेवढाच कर्नाटकात आल्यावरही होतो. मलाही तोच आनंद होतो”, असे राहुल गांधी म्हणाले.

“भाजपच्या लोकांनी तिकडे आग लावली”

तुमच्या डीएनएमध्ये काँग्रेस आहे. आज लढाई विचारधारेची आहे. देशात पाहत आहात. पूर्वी राजकारण व्हायचं. आज भारतात विचारधारेचं युद्ध सुरू आहे. एकीकडे काँग्रेस आणि आपले महापुरुष, दुसरीकडे भाजप. आपल्याला सर्वांना पुढे घेऊन जायचं. पण त्यांना काही लोकांचा फायदा करायचा आहे. दलित दलित राहिले पाहिजे, मागास मागास राहिले पाहिजे. आदिवासी आहे तसेच राहिले पाहिजे. जातीची चौकट राहिली पाहिजे असं त्यांना वाटतं. त्यांना द्वेष पसरवायचा आहे. हिंसा भडकवायचे आहे. एका धर्माला दुसऱ्याच्याबद्दल भडकवत आहेत. मणिपूर सिव्हिल वॉर सारखं झालं आहे. दीड वर्ष झाले पण पंतप्रधान तिकडे गेले नाहीत. जाऊच शकत नाही. कारण भाजपच्या लोकांनी तिकडे आग लावली, असा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला.

“भाजपचे लोक संविधान बदलू पाहत आहे”

मी एकटाच कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत गेलो नाही. आपण सर्वच चालत गेलो. देश चालला. आपण मोहब्बतची दुकान उघडली. या लोकांनी देशातील प्रत्येक कोपऱ्यात द्वेष निर्माण केला आहे. अनेक शतकांपासून सुरू आहे. गेल्या अनेक दशकापासून चीही विचारधारेची लढाई होती. यापूर्वी फुल्यांनी हीच लढाई लढली. शिवाजी महाराजांनी लढली. त्यांच्या आणि काँग्रेसच्या विचारधारेत काही फरक नाही. आंबेडकर, शाहू, फुले आणि शिवाजी यांची विचारधारा ही काँग्रेसचीच विचारधारा आहे. तुम्ही या महापुरुषांचे विचार वाचा. त्यांचे विचार आपल्या संविधानात आहे. निवडणुकीत आपण ही लढाई विचारधारेची असल्याचं म्हटलं. भाजपचे लोक संविधान बदलू पाहत आहेत, असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले.

सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'.
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!.
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?.