लंडनमध्ये मुस्लीम मुलीवर प्रेम, सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी
मुंबई : राजस्थानमध्ये पुन्हा एकदा सत्ता काबिज करण्यात काँग्रेसला यश आलंय. या विजयामध्ये सचिन पायलट यांची मोठी भूमिका आहे. त्यामुळेच अनेक आमदार सचिन पायलट मुख्यमंत्री व्हावेत यासाठी आग्रही होते. पण राजस्थानमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गहलोत यांच्यावरच मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. राजकारणाशिवाय सचिन पायलट यांचं खासगी आयुष्यही रोमांचक आहे. त्यांची लव्ह स्टोरी सध्या पुन्हा चर्चेत […]
मुंबई : राजस्थानमध्ये पुन्हा एकदा सत्ता काबिज करण्यात काँग्रेसला यश आलंय. या विजयामध्ये सचिन पायलट यांची मोठी भूमिका आहे. त्यामुळेच अनेक आमदार सचिन पायलट मुख्यमंत्री व्हावेत यासाठी आग्रही होते. पण राजस्थानमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गहलोत यांच्यावरच मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. राजकारणाशिवाय सचिन पायलट यांचं खासगी आयुष्यही रोमांचक आहे. त्यांची लव्ह स्टोरी सध्या पुन्हा चर्चेत आली आहे.
लंडनमध्ये मुस्लीम मुलीवर प्रेम
सचिन पायलट यांचं शिक्षण एअरफोर्स स्कूलमध्ये पूर्ण झालं. यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून बीएची डिग्री मिळवली. गाझियाबाद आयएमटीमधून मार्केटिंगचा डिप्लोमा पूर्ण केला आणि पुढील शिक्षणासाठी ते लंडनला गेले. तिथे त्यांनी पेनसिल्वेनिया विद्यापीठात एमबीएची डिग्री घेतली.
लंडनमध्ये काही दिवसातच सचिन पायलट यांची भेट सारा अब्दुल्ला नावाच्या तरुणीसोबत झाली आणि ते एकमेकांना डेट करायला लागले. सारा ही काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांची मुलगी आहे.
लग्नाला घरच्यांचा विरोध
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सचिन पायलट भारतात परतले, तर सारा लंडनमध्येच राहिली. हे अंतर आल्यानंतरही त्यांचं नातं कायम राहिलं. विविध माध्यमातून ते बोलायचे. त्यांनी जवळपास तीन वर्ष एकमेकांना डेट केलं आणि अखेर कुटुंबीयांना याबाबत सांगण्याचा निर्णय घेतला.
सचिन आणि सारा यांनी जेव्हा ही गोष्ट कुटुंबाला सांगितली, तेव्हा त्यांच्या प्रेमाच्या मध्ये मोठी भिंत उभी राहिली. कारण, सचिन पायलट हे हिंदू कुटुंबातून होते, तर सारा मुस्लीम होती. त्यामुळे सचिन पायलट यांच्या कुटुंबीयांनी लग्नाला स्पष्ट नकार दिला. तर सारासाठीही हा मार्ग खडतर होता.
फारुख अब्दुल्ला यांनी साराचं म्हणणं ऐकून घेण्यासही नकार दिल्याचं बोललं जातं. पण साराने माघार घेतली नाही. वडिलांचं मन वळवण्यासाठी सारा यांनी अनेक प्रयत्न केले. अखेर सचिन आणि सारा यांनी कुणाचीही पर्वा न करता 2003 साली लग्न केलं.
या लग्नासाठी अब्दुल्ला कुटुंबातील एकही सदस्य सहभागी झाला नाही. पण पायलट कुटुंबीयांना साराला मोठा आधार दिला. काही काळ गेल्यानंतर अब्दुल्ला कुटुंबानेही दोघांचं नातं स्वीकारलं.
अचानक राजकारणात एंट्री
सचिन पायलट यांनी राजकारणात येण्याबाबत कधी विचारही केला नव्हता. पण त्यांचे वडील राजेश पायलट यांच्या अकाली निधनानंतर राजकीय वारसा सांभाळण्यासाठी सचिन पायलट यांना वयाच्या 26 व्या वर्षी राजकारणात यावं लागलं. सचिन पायलट यांनी 2004 सालच्या निवडणुकीत राजस्थानमधील दौसा लोकसभा मतदारसंघातून मोठा विजय मिळवला.
सचिन पायलट यांनी 2014 च्या निवडणुकीतही विजय मिळवला होता. पण त्यांना काँग्रेसने आता राज्याच्या राजकारणात आणलंय. सचिन पायलट हे काँग्रेसचे दिवंगत नेते राजेश पायलट यांचे चिरंजीव आहेत. राजेश पायलट यांचा 2000 साली जयपूरमध्ये एका कार अपघातात मृत्यू झाला. राजेश पायलट सलग 20 वर्ष खासदार होते.