‘लक्ष्मीला नाकारु नका’ सल्ल्यावरुन निरुपम यांचा यशोमती ठाकूरांना घरचा आहेर

खातेवाटप जाहीर झाल्यानंतर काही तासांतच यशोमती ठाकूर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला. हा व्हिडीओ संजय निरुपम यांनी ट्विटरवर शेअर केला.

'लक्ष्मीला नाकारु नका' सल्ल्यावरुन निरुपम यांचा यशोमती ठाकूरांना घरचा आहेर
Follow us
| Updated on: Jan 06, 2020 | 8:12 AM

मुंबई : ‘घरी आलेल्या लक्ष्मीला नाही म्हणू नका’ असा सल्ला देणाऱ्या काँग्रेसच्या नवनिर्वाचित मंत्री यशोमती ठाकूर यांना काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी घरचा आहेर दिला आहे. ‘याच दिवसासाठी यांनी पक्षावर सरकार स्थापन करण्यासाठी दबाव टाकला होता का?’ असा सवाल निरुपम यांनी ट्विटरवरुन विचारला (Sanjay Nirupam on Yashomati Thakur) आहे.

यशोमती ठाकूर यांच्याकडे ठाकरे सरकारमध्ये महिला आणि बालकल्याण विभागाची धुरा सोपवण्यात आली आहे. खातेवाटप जाहीर झाल्यानंतर काही तासांतच ठाकूर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला. हा व्हिडीओ संजय निरुपम यांनी ट्विटरवर शेअर केला.

‘या आहेत आमच्या नव्या मंत्री. म्हणत आहेत, आताच शपथ घेतली आहे, खिसा अजून गरम झालेला नाही. अशा गोष्टी करुन हे लोक स्वतःसोबतच पक्षाचं नावही बदनाम करत आहेत. हाच दिवस पाहण्यासाठी यांनी पक्षावर सरकार स्थापन करण्यासाठी दबाव टाकला होता का?’ असं ट्वीट निरुपम यांनी केलं आहे.

संजय निरुपम यांनी स्वपक्षावर टीका करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी त्यांनी माजी खासदार मिलिंद देवरा यांच्यावरही आगपाखड केली होती. तसंच शिवसेनेसोबत सत्तास्थापनेवरुनही निरुपम यांनी काँग्रेसला सुनावलं होतं. 

काय आहे प्रकरण?

अकोला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकूर यांनी मतदारांना अनोखा सल्ला दिला होता. ‘जे लोकं आपल्या विरोधात आहेत, त्यांचे खिसे बंबाटच भरले आहेत. आणि त्यांचे खिसे खाली करायला आपल्या घरी येतच असंल ना. तो उनको नही मत बोलना, घर पे आयी लक्ष्मी को कौन नहीं बोलता है? अरे लेकिन वोट पंजे को डालना’ असं ठाकूर भाषणादरम्यान म्हणाल्या.

अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातील आलेगाव जिल्हा परिषद सर्कलमध्ये काँग्रेस उमेदवाराचा प्रचारासाठी यशोमती ठाकूर आल्या होत्या. मतदारांना हा सल्ला देतानाच ठाकूर यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही सडकून टीका केली होती. रस्त्यातील खड्ड्यांचा विषयही त्यांनी आवर्जून काढला होता.

कॅबिनेट मंत्र्याने लक्ष्मी घेण्याचा सल्ला दिल्याने मतदारांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. यशोमती ठाकूर यांच्या वक्तव्याविरोधात भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. यावरुन आता वाद निर्माण होण्याची शक्यता (Sanjay Nirupam on Yashomati Thakur) आहे.

लक्ष्मीदर्शनाचा दानवेंचा सल्ला

लक्ष्मीदर्शनाचा सल्ला देणाऱ्या ठाकूर या पहिल्याच नाहीत. याआधी, भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनीही डिसेंबर 2016 मध्ये अशाप्रकारचा सल्ला दिला होता. पैठण नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या प्रचारावेळी आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत बोलताना दानवे यांनी ‘लक्ष्मीदर्शना’संबंधी वक्तव्य केलं होतं. ‘निवडणुकीच्या एक दिवस आधी लक्ष्मी दर्शन होत असते आणि अशी लक्ष्मी जर घरी चालून आली, तर तिला परत करु नका, उलट तिचे स्वागत करा,’ असं वक्तव्य दानवे यांनी केलं होतं.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.