सत्यजित देशमुख यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार
सत्यजित देशमुख (Satyajit Deshmukh Join BJP) यांच्यासह शिरोळा तालुक्यातील सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.
सांगली : सांगलीचे काँग्रेस नेते आणि पक्षाचे प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख (Satyajit Deshmukh) उद्या (16 सप्टेंबर) भाजपात प्रवेश घेणार आहे. सत्यजित देशमुख (Satyajit Deshmukh Join BJP) यांच्यासह शिरोळा तालुक्यातील सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या राजीनाम्यामुळे शिरोळ तालुक्यात काँग्रेसला मोठा फटका बसणार आहे.
सत्यजित देशमुख हे काँग्रेसचे माजी मंत्री आणि माजी प्रदेशाध्यक्ष स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांचे पुत्र आहेत. सत्यजित देशमुख यांच्यासह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे दिल्याने सांगलीत काँग्रेसला भगदाड (Satyajit Deshmukh Join BJP) पडणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्यजित देशमुख यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे.
सद्यस्थितीत राष्ट्रवादी पक्ष हा स्वार्थाच्या मुद्यावर सुरू आहे, म्हणून त्यांची शकलं पडत आहेत. पक्षाचे तुकडे तुकडे होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 1995 ची काँग्रेसची सत्ता घालवली अशी टीका सत्यजीत देशमुख (Satyajit Deshmukh Join BJP) यांनी केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सत्यजित देशमुख भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र त्यानंतर सत्यजित देशमुख यांनी भाजप प्रवेशाचं वृत्त फेटाळलं. “भाजप प्रवेशाबाबतचं वृत्त तथ्यहीन आहे. या बातमीने मला धक्का बसला. मी काँग्रेससोबत आहे आणि काँग्रेससोबतच राहीन. कोणीतरी जाणीवपूर्वक याअफवा पसरवत आहे”, असे ते म्हणाले होते.
कोण आहेत सत्यजित देशमुख?
सत्यजित देशमुख हे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांचे पुत्र आहेत सत्यजित देशमुख यांनी काँग्रेसकडून मंत्रिपद भूषवलं होतं. सांगली जिल्ह्यात देशमुख कुटुंबाला मानणारा गट आहे.