Satyajit Tambe : सरकार बेरोजगारांची थट्टा करतय; गोविंदाच्या आरक्षणावरून सत्यजित तांबेंचा निशाणा

सध्या गोविंदाच्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सभागृहात गोविंदाच्या आरक्षणाचा मुद्दा मांडला. त्यावर आता विविध संघटना आणि विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे.

Satyajit Tambe : सरकार बेरोजगारांची थट्टा करतय; गोविंदाच्या आरक्षणावरून सत्यजित तांबेंचा निशाणा
सत्यजित तांबे
Follow us
| Updated on: Aug 20, 2022 | 11:19 AM

मुंबई : सध्या गोविंदाच्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सभागृहात गोविंदाच्या आरक्षणाचा मुद्दा मांडला. त्यावर आता विविध संघटना आणि विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी देखील सरकारच्या या निर्णयाविरोधात आक्रमक झाले आहेत. सरकारने निर्णय मागे घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. आता या सर्व पार्श्वभूमीवर युवककाँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारने दहिहंडीचा समावेश हा खेळात केला याबाबत काहीच आक्षेप नाही. मात्र गोविंदाना शासकीय नोकरीत (Govt job) आरक्षण देण्याचा निर्णय म्हणजे  देश आणि राज्यातील बेरोजगारांची सरकारने केलेली चेष्टा असल्याचा घणाघात सत्यजीत तांबे यांनी केला आहे. हा निर्णय चुकीचा आहे, सरकारने या निर्णयाचा पुनर्विचार करावा आणि नोकरभरती सुरू करावी अशी मागणीत तांबे यांनी केली आहे.

 अजित पवारांचीही टीका

दरम्यान दुसरीकडे अजित पवार यांनी देखील या निर्णयावरून राज्य सरकारवर चांगलाच निशणा साधला आहे. ऑलिम्पिंकमध्ये किंवा इतर खेळात जे खेळाडू सर्वोच्च कामगिरी करतात त्यांना त्यांची शैक्षणिक पात्रता पाहून त्यांना सरकारी नोकरीची संधी दिली जाते. त्या खेळाडूंच्या नोंदी ठेवणाऱ्या संघटना असतात. मात्र दहीहंडीची नोंद तुम्ही कशी ठेवणार असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. समजा एखादा गोविंदा शिकलाच नसेल मात्र त्यांने जर या खेळात पारितोषिक जिंकले तर त्याला कोणती नोकरी देणार असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

‘आरक्षण वाढवले नाही’

दरम्यान अजित पवार यांच्या टीकेला मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. खेळाडूसाठीचे आरक्षण वाढवण्यात आले नाही तर त्याच पाच टक्के आरक्षणात गोविंदांचा देखील समावेश करण्यात आल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. उद्या कोणी म्हटलं विटी-दांडू या खेळाला देखील आरक्षण द्या तर त्याचा देखील विचार केला जाऊ शकतो त्यात चुकीचं काय असा सवाल चंद्रकांत पाटलांनी उपस्थित केला आहे.

Non Stop LIVE Update
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.