Ram Mandir | जगभरातील कोट्यवधी राम भक्तांच स्वप्न सोमवारी साकार झालं. अयोध्येत भव्य राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे मुख्य यजमान होते. यजमान या नात्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कठोर अनुष्ठान पाळलं. पूजाऱ्यांनी मोदींना 3 दिवसांचा उपवास ठेवायला सांगितला होता. पण मोदींनी कठोर 11 दिवसांच अनुष्ठान पाळलं. 11 दिवस मोदींनी उपवास केला. त्याबद्दल साधू, संत आणि देशातील जनतेने मोदींच कौतुक केलं. पण आता एका मोठ्या काँग्रेस नेत्याने या उपवास पाळण्यावर संशय व्यक्त केला आहे.
“मी डॉक्टरसोबत मॉर्निंग वॉकला गेलो होतो. 11 दिवस उपवास केल्यानंतर माणूस जिवंत राहू शकत नाही, असं त्याने मला सांगितलं. पण मोदी जिवंत असतील, तर तो चमत्कार आहे. त्यामुळे त्यांनी उपवास केला का? या बद्दल माझ्या मनात संशय आहे” असं काँग्रेस नेते वीरप्पा मोईली मंगळवारी मीडियाशी बोलताना म्हणाले. “राम मंदिराच्या गर्भ गृहात त्यांनी उपवासाशिवाय प्रवेश केला असेल, तर ती जागा अशुद्ध झालीय. तिथून ऊर्जा निर्माण होणार नाही” असं वीरप्पा मोईली म्हणाले.
भगवान प्रभू रामचंद्रांबद्दल श्रद्धा असेल, तर तुम्ही सुद्धा….
“भगवान प्रभू रामचंद्रांबद्दल श्रद्धा असेल, तर तुम्ही सुद्धा उपवास करुन जिवंत राहू शकता. गांधी कुटुंबाला कितीही खूश करण्याचे प्रयत्न केले तरी मोईली यांना चिक्काबल्लापूरमधून काँग्रेसच तिकीट मिळणार नाही” असं कर्नाटकामधील भाजपा खासदार लहर सिंह सिरोया यांनी म्हटलं आहे.
You can fast and survive if you have faith in Lord Ram, not if you are pleasing the Gandhi family. Despite this effort to please the family, Moily will not get Congress ticket to contest from Chikkaballapur. 2/2@BYVijayendra @RAshokaBJP @INCKarnataka @BJP4Karnataka
— Lahar Singh Siroya (@LaharSingh_MP) January 23, 2024
गोविंद देवगिरी महाराज यांच्या हातून पाणी पिऊन मोदींनी प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी त्यांचा 11 दिवसांचा उपवास सोडला. 22 जानेवारीला अयोध्येत भव्य राम मंदिराच उद्गाटन झालं. मंदिर उघडल्यानंतर मागच्या दोन दिवसांपासून रामललाच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी होत आहे.