काँग्रेसचा एल्गार, नागपुरात राष्ट्रवादीशी आघाडी नाही, स्वबळाचा नारा

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असलं तरी नागपूर महानगरपालिकेची २०२२ मध्ये होणारी निवडणूक  स्वबळावर लढवावी, अशी मागणी आता काँग्रेस नेत्यांनी करायला सुरुवात केली आहे. Congress leaders said they don't make any alliance with NCP for Nagpur municipal corporation election

काँग्रेसचा एल्गार, नागपुरात राष्ट्रवादीशी आघाडी नाही, स्वबळाचा नारा
Follow us
| Updated on: Oct 22, 2020 | 8:15 PM

नागपूर: राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असलं तरी नागपूर महानगरपालिकेची २०२२ मध्ये होणारी निवडणूक  स्वबळावर लढवावी, अशी मागणी आता काँग्रेस नेत्यांनी करायला सुरुवात केली आहे. महत्वाचे म्हणजे काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी देखील पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना स्वबळावर लढण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे आता राज्याच्या सत्तेतील समीकरण नागपूर महानगरपालिका निवडणुकीत कायम राहणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Congress leaders said they don’t make any alliance with NCP for Nagpur municipal corporation election)

नागपूर महापालिका भाजपचा गड समजला जातो. नागपूर महानगरपालिकेवर गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचे निर्विवाद वर्चस्व आहे. महानगर पालिकेच्या निवडणुकीला अजून वेळ शिल्लक असला तरी राष्ट्रवादी काँग्रेस  आणि काँग्रेस आत्तापासूनच कामाला लागल्याचे बघायला मिळत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या स्थानिक पातळीवरील नेत्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घ्यायला सुरुवात केली आहे. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला नागपूर शहरातून अनपेक्षित यश मिळालं होतं. शहरातील सहा पैकी दोन जागा काँग्रेसच्या पदरात पडल्या होत्या. याचाच फायदा हा महानगरपालिका निवडणुकीत होऊ शकतो असा काँग्रेस कार्यकर्त्यांचा अंदाज आहे. २०१७ च्या तुलनेत आजच्या घडीला काँग्रेस पक्ष मजबूत दिसत असल्यानेच निवडणुकीपूर्वी युती होऊ नये, यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आग्रह धरला आहे.

काँग्रेसनं 2012 ला सर्व पक्षांना साेबत घेऊन निवडणूक लढवली आणि 2017 ला स्वबळावर निवडणूक लढवली. दोन्ही निवडणुकांचा अनुभव चांगला नव्हता. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते स्वबळावर लढणार असल्याची घोषणा करुन गेले. त्यांना लढायचे असल्यास त्यांनी लढावे. मात्र, आम्ही महापालिकेत कशी सत्ता आणता येईल, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे, काँग्रेसचे महासचिव संदेश सिंगलकर यांनी सांगितले.

राज्यात सत्तेत असलेली काँग्रेस आणि राष्ट्रवादी नागपूर महापालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीत आघाडी करणार की स्वबळाचा पर्याय स्वीकारणार पाहावं लागणार आहे. सध्या महापालिकेची सत्ता भाजपच्या ताब्यात आहे. महापौर संदीप जोशी महापालिकेचा कार्यभार पाहत आहेत.

संबंधित बातम्या :

IAS Transfer | तुकाराम मुंढे यांची बदली, नागपूर महापालिका आयुक्तपदी कोण?

Tukaram Mundhe | नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची मुंबईत बदली

(Congress leaders said they don’t make any alliance with NCP for Nagpur municipal corporation election)

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.