बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनी काँग्रेसश्रेष्ठींनी साधं ट्विटही केलं नाही; नितेश राणेंनी शिवसेनेला डिवचलं

राज्यात शिवसेनेसोबत सत्तेत मांडीला मांडी लावून बसलेल्या काँग्रेसच्या नेतृत्त्वाने बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल कोणतेही ट्विट किंवा संदेश प्रसारित केला नव्हता. | Nitesh Rane

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनी काँग्रेसश्रेष्ठींनी साधं ट्विटही केलं नाही; नितेश राणेंनी शिवसेनेला डिवचलं
Follow us
| Updated on: Nov 18, 2020 | 7:36 AM

मुंबई: महाविकासआघाडीतील काँग्रेस पक्षाला दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray)  यांच्याविषयी आदर नसल्याचा आरोप भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला आहे. काल बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन होता. मात्र, संपूर्ण दिवसभरात काँग्रेसच्या शीर्षस्थ नेत्यांकडून बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी संदेश किंवा साधे ट्विटही करण्यात आले नाही. काँग्रेस बाळासाहेब ठाकरे यांचीच दखल घेणार नसेल तर मग शिवसेनेकडे उरले तरी काय, असा परखड सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आता यावर शिवसेना आणि काँग्रेस पक्ष काय प्रतिक्रिया देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Nitesh Rane take a dig at Shivsena over congress stands about late Balasaheb Thackeray)

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आठवा स्मृतीदिन सोहळा मंगळवारी संपन्न झाला. यानिमित्ताने राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना आदरांजली वाहिली होती. तर बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतीस्थळ असलेल्या शिवाजी पार्क येथे शिवसैनिकांनी गर्दी केली होती. पंकजा मुंडे, रामदास आठवले यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट दिली. तर इतर नेत्यांनी सोशल मीडियावरुन बाळासाहेबांविषयीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

मात्र, राज्यात शिवसेनेसोबत सत्तेत मांडीला मांडी लावून बसलेल्या काँग्रेसच्या नेतृत्त्वाने बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल कोणतेही ट्विट किंवा संदेश प्रसारित केला नव्हता. नितेश राणे यांनी नेमका हाच धागा पकडत आता शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यात महाविकासआघाडीची सत्ता आल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काँग्रेसला वंदनीय असणाऱ्या व्यक्तींचा मान राखताना दिसत आहेत. याची छायाचित्रेही सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, आता काँग्रेसच्या भूमिकेमुळे शिवसेनेची पुन्हा एकदा अडचण होण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या:

…तर हिंदुत्वाशी तडजोड झाली नसती, बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनी नारायण राणेंचे ट्विट

PHOTO : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा स्मृतीदिन, उद्धव ठाकरेंचं सहकुटुंब अभिवादन

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनी देवेंद्र फडणवीसांचे ट्विट, म्हणाले…

(Nitesh Rane take a dig at Shivsena over congress stands about late Balasaheb Thackeray)

Non Stop LIVE Update
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान.
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?.
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या.