काँग्रेसचे विधानसभेसाठी 60 उमेदवार ठरले
पुढची बैठक ही 10 सप्टेंबरला होणार असून त्याच दिवशी पहिली यादी (Congress Maharashtra vidhansabha candidates) जाहीर होईल आणि इतर नावेही ठरवली जातील, असंही शिंदे म्हणाले.
नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभेसाठी काँग्रेसचे 60 उमेदवार ठरले (Congress Maharashtra vidhansabha candidates) असून पहिली यादी 10 सप्टेंबरला जाहीर केली जाणार आहे. काँग्रेस नेते ज्योतीरादित्य शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली छाननी समितीची दिल्लीत बैठक झाली. या बैठकीनंतर ज्योतीरादित्य शिंदे यांनी ही माहिती दिली. शिवाय पुढची बैठक ही 10 सप्टेंबरला होणार असून त्याच दिवशी पहिली यादी (Congress Maharashtra vidhansabha candidates) जाहीर होईल आणि इतर नावेही ठरवली जातील, असंही शिंदे म्हणाले.
बैठकीसाठी महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार हे देखील उपस्थित होते. काँग्रेसने विविध मतदारसंघांमध्ये उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारावर छाननी समितीकडून केली जाईल. यानंतर अंतिम यादी जाहीर होईल.
दरम्यान, गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे 42 आमदार निवडून आले होते. त्यापैकी काही जणांनी यावेळी भाजपात प्रवेश केलाय, तर अजून काही जण भाजपच्या वाटेवर आहेत. त्यामुळे उर्वरित विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात अजून जागेचा फॉर्म्युला ठरलेला नाही. त्यामुळे काँग्रेसकडून नेमके कोणत्या जागेसाठी उमेदवार जाहीर केले जातात ते पाहणंही महत्त्वाचं आहे. राष्ट्रवादीनेही जागा वाटपाबाबत चर्चा सुरु केली आहे, पण याला अजून अंतिम स्वरुप आलेलं नाही.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2014 निकाल
- भाजप- 122
- शिवसेना- 63
- काँग्रेस- 42
- राष्ट्रवादी- 41
- बहुजन विकास आघाडी- 3
- शेतकरी कामगार पक्ष- 3
- एमआयएम- 2
- भारिप बहुजन महासंघ- 1
- मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी- 1
- महाराष्ट्र नवनिर्माण सेना- 1
- राष्ट्रीय समाज पक्ष- 1
- समाजवादी पार्टी- 1
- अपक्ष- 7