सुरेखा पुणेकर 3 दिवसांपासून दिल्लीत, काँग्रेसकडून लावणी सम्राज्ञीला पुण्याचं तिकीट?
पुणे: काँग्रेसकडून पुणे लोकसभेचा उमेदवार कोण हे अद्याप ठरलेलं नाही. तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होऊनही, काँग्रेसचा अद्याप उमेदवारच न ठरल्याने, मोठा गोंधळ उडाला आहे. संभाजी ब्रिगेडचे नेते प्रविण गायकवाड यांनी नाराजी व्यक्त करत काँग्रेसच्या तिकिटाच्या शर्यतीतून माघार घेतली. त्यामुळे काँग्रेस नगरसेवक अरविंद शिंदे यांचं नावावर एकमत होईल अशी शक्यता असतानाच, आता पुण्यात काँग्रेसकडून […]
पुणे: काँग्रेसकडून पुणे लोकसभेचा उमेदवार कोण हे अद्याप ठरलेलं नाही. तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होऊनही, काँग्रेसचा अद्याप उमेदवारच न ठरल्याने, मोठा गोंधळ उडाला आहे. संभाजी ब्रिगेडचे नेते प्रविण गायकवाड यांनी नाराजी व्यक्त करत काँग्रेसच्या तिकिटाच्या शर्यतीतून माघार घेतली. त्यामुळे काँग्रेस नगरसेवक अरविंद शिंदे यांचं नावावर एकमत होईल अशी शक्यता असतानाच, आता पुण्यात काँग्रेसकडून नव्याच नावाची चर्चा सुरु झाली आहे. काँग्रेसकडून पुणे लोकसभेसाठी लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांना विचारणा झाल्याचं सांगण्यात येत आहे. सूत्रांनी ही माहिती दिली. सुरेखा पुणेकर या गेल्या तीन दिवसांपासून दिल्लीत आहेत.
सुरेखा पुणेकर यांना काँग्रेकडून उमेदवारी मिळाल्यास पुण्यात सुरेखा पुणेकर विरुद्ध भाजपचे गिरीश बापट यांच्यात लढत होऊ शकते. मात्र काँग्रेसने सुरेखा पुणेकर यांच्या नावावर अद्याप शिक्कामोर्तब केलेलं नाही. काँग्रेस आपल्या उमेदवाराची अधिकृत घोषणा कधी करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
वाचा – काँग्रेसकडे उर्मिलासाठी वेळ, माझ्यासाठी नाही, प्रविण गायकवाडांची माघार
काँग्रेस कार्यालयाबाहेर शुकशुकाट
येत्या 23 एप्रिल रोजी पुण्यात लोकसभेसाठी मतदान होणार आहे. या लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून गिरीश बापट यांना उमेदवारी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येत आहे. एकीकडे उमेदवारी अर्ज भरण्याचे चित्र असताना दुसरीकडे मात्र काँग्रेसकडून या मतदारसंघासाठी उमेदवारच जाहीर झालेला नाही. त्यामुळे पुण्यातील काँग्रेस भवनाबाहेर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे उमेदवार जाहीर झालेला नसतानाही काँग्रेस भवन बाहेर निवडणूक कचेरीसह, प्रचार साहित्य इत्यादी गोष्टी दिसत आहे.
वाचा – बापटांविरोधात पुण्यात काँग्रेसकडून ‘ही’ पाच नावं चर्चेत!
अरविंद शिंदे यांचंही नाव चर्चेत
दरम्यान, पुण्यात काँग्रेसकडून अरविंद शिंदे यांचंही नाव चर्चेत आहे. अरविंद शिंदे हे पुणे महानगरपालिकेत नगरसेवक असून, काँग्रेसचे महापालिका गटनेते आहेत. पुण्यातील त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. अरविंद शिंदे यांचे नाव पुणे लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून पुढे आले आहे. मात्र, त्यांच्याही नावावर अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. मात्र, अरविंद शिंदे हे काँग्रेसकडून प्रबळ दावेदार असल्याची माहिती आहे.
संबंधित बातम्या
काँग्रेसकडे उर्मिलासाठी वेळ, माझ्यासाठी नाही, प्रविण गायकवाडांची माघार
पुणे काँग्रेस भवनात शुकशुकाट, उमेदवार जाहीर करा, कार्यकर्त्यांची मागणी
काँग्रेसकडे उर्मिलासाठी वेळ, माझ्यासाठी नाही, प्रविण गायकवाडांची माघार
बापटांविरोधात पुण्यात काँग्रेसकडून ‘ही’ पाच नावं चर्चेत!
काँग्रेसकडून पुण्यातून प्रविण गायकवाड की अरविंद शिंदे? संध्याकाळपर्यंत ठरणार