जेव्हा अशोक चव्हाण स्वतःच्या हाताने आपलंच बॅनर हटवतात…

नांदेड : ‘लोका सांगे ब्रम्हज्ञान, आपण कोरडे पाषाण’ ही वृत्ती अनेक लोकप्रतिनिधींमध्ये पाहायला मिळते. मात्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये स्वतःचंच अनधिकृत बॅनर (Ashok Chavan removes own banner) हटवून नवा पायंडा घातला. अशोक चव्हाण आज (शनिवार) सकाळीच अॅक्शन मूडमध्ये पाहायला मिळाले. सकाळी नांदेडमधील निवासस्थानाहून निघताच रस्त्यात अशोक चव्हाणांना काँग्रेसचं […]

जेव्हा अशोक चव्हाण स्वतःच्या हाताने आपलंच बॅनर हटवतात...
Follow us
| Updated on: Jan 18, 2020 | 10:21 AM

नांदेड : ‘लोका सांगे ब्रम्हज्ञान, आपण कोरडे पाषाण’ ही वृत्ती अनेक लोकप्रतिनिधींमध्ये पाहायला मिळते. मात्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये स्वतःचंच अनधिकृत बॅनर (Ashok Chavan removes own banner) हटवून नवा पायंडा घातला.

अशोक चव्हाण आज (शनिवार) सकाळीच अॅक्शन मूडमध्ये पाहायला मिळाले. सकाळी नांदेडमधील निवासस्थानाहून निघताच रस्त्यात अशोक चव्हाणांना काँग्रेसचं एक अनधिकृत बॅनर दिसलं. या बॅनरवर चव्हाणांना स्वतःचाच फोटो दिसला.

अशोक चव्हाण यांनी लगेच आपला ताफा थांबवला. ते स्वतः गाडीतून उतरले आणि कार्यकर्त्यांच्या मदतीने त्यांनी बॅनर तिथून काढून टाकलं.

नांदेड शहरात यापुढे अनधिकृत बॅनर लावू देणार नसल्याचं चव्हाण यांनी यावेळी सांगितलं. अनधिकृत बॅनरमुळे शहराचं विद्रुपीकरण झाल्याची भावना अशोक चव्हाणांनी बोलून दाखवली.

अशोक चव्हाण यांनी स्वतःपासून सुरुवात करत आपल्याच पक्षाचे बॅनर (Ashok Chavan removes own banner) हटवले. किमान यापुढे तरी नांदेडमध्ये बॅनरचे अतिक्रमण दिसणार नाही, अशी आशा आता शहरवासियांना आहे.

ठाकरे मंत्रिमंडळामध्ये अशोक चव्हाणांकडे सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाची धुरा सोपवण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री असलेल्या अशोक चव्हाणांना ज्येष्ठतेनुसार मंत्रिमंडळातील वजनदार खातं मिळालं आहे.

नांदेड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी अशोक चव्हाणांना पराभवाची धूळ चारली होती. 40 हजारांच्या मताधिक्याने चिखलीकर निवडून आले होते.

विधानसभा निवडणुकीत अशोक चव्हाण पत्नी अमिता चव्हाण यांच्या जागी नांदेडमधील भोकर मतदारसंघातून रिंगणात उतरले. भाजपने त्यांच्याविरोधात श्रीनिवास देशमुख गोरठेकर यांच्या रुपाने तगडं आव्हान दिलं होतं. मात्र अशोक चव्हाणांना भोकरचा गड राखण्यात यश आलं.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.