भाजपमध्ये अस्वस्थता, काँग्रेसमध्ये घरवापसीसाठी अनेकांचे प्रयत्न : बाळासाहेब थोरात
एकनाथ खडसे यांनी महाविकासाघाडीत प्रवेश केला ही चांगली गोष्ट आहे, असे बाळासाहेब थोरात म्हणाले. (Balasaheb Thorat On Eknath Khadse join NCP)
मुंबई : भाजपचे बंडखोर नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर त्यावर विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. नुकतंच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी यावर प्रतिक्रिया दिली. एकनाथ खडसे यांनी महाविकासाघाडीत प्रवेश केला ही चांगली गोष्ट आहे, असे बाळासाहेब थोरात म्हणाले. (Balasaheb Thorat On Eknath Khadse join NCP)
खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला ही चांगली गोष्ट आहे. त्यांनी इतके वर्ष पक्षासाठी काम केलं. पण पक्षाने त्यांची दखल घेतली नाही. त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना आहे, असेही बाळासाहेब थोरात म्हणाले. तसेच भाजपमध्ये अस्वस्थता पसरली आहे. तिथे गेलेले अनेक जण परत यायचा प्रयत्न करत आहेत, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.
दरम्यान अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरच दिलासा देऊ. याबाबत पंचनामे सुरु आहेत. त्यामुळे कागदोपत्री आल्यावर मदत करावी लागते. शेतकऱ्यांना चांगला दिलासा द्यायचा प्रयत्न करु, असेही बाळासाहेब थोरात म्हणाले.
एकनाथ खडसेंच्या घरी कार्यकर्त्यांची रेलचेल, राजकीय भूकंप करण्यासाठी फौज सज्ज
एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर त्यांच्या बंगल्यावर समर्थक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची रेलचेल सुरु झाली आहे. अनेक कार्यकर्त्यांमध्ये खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची उत्सुकता असून राजकीय भूकंप करण्यासाठी फौज सज्ज झाल्याचं ही पाहायला मिळत आहे. “नाथाभाऊ जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल,” अशी भावना एकनाथ खडसेंचे कार्यकर्ते व्यक्त करत आहे. (Balasaheb Thorat On Eknath Khadse join NCP)
संबंधित बातम्या :
फडणवीसांना बदनाम करण्यासाठी खडसेंचा गेम करत राष्ट्रवादीत प्रवेश, प्रवीण दरेकरांचा आरोप
10 आमदार माझ्या संपर्कात, खडसेंचा दावा; भाजपमध्ये लवकरच मोठा राजकीय भूकंप होणार?