जो शिशों के घरो मे रहते है… जयंत पाटील-चंद्रकांतदादांच्या वादात विश्वजित कदमांची उडी

कोरोना'च्या संकटात कोणीही राजकारण करु नये. आता सर्वांनी एकत्रित काम करण्याची वेळ आहे, असं आवाहन विश्वजित कदम यांनी केलं. (Vishwajit Kadam taunts Chandrakant Patil)

जो शिशों के घरो मे रहते है... जयंत पाटील-चंद्रकांतदादांच्या वादात विश्वजित कदमांची उडी
Follow us
| Updated on: Apr 13, 2020 | 12:31 PM

सांगली : ‘जो शिशों के घरो मे रहते है, वो दुसरोंके घरो पे पत्थर फेका नही करते’ अशा शब्दात कॉंग्रेस आमदार आणि कृषि राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे. मंत्री जयंत पाटील आणि चंद्रकांत पाटील यांच्यात रंगलेल्या वाक-युद्धात कदमांनी उडी घेतली (Vishwajit Kadam taunts Chandrakant Patil)

महापुराच्या काळात भाजप नेत्यांनी जनतेला काय मदत केली, हे सर्वांना माहित आहे. चंद्रकांतदादांसारख्या ज्येष्ठ नेत्याने असे वक्तव्य करणं चुकीचे आहे. ‘कोरोना’च्या संकटात कोणीही राजकारण करु नये. आता सर्वांनी एकत्रित काम करण्याची वेळ आहे, असं आवाहन विश्वजित कदम यांनी केलं.

जयंत पाटील हे मूळ सांगलीचे, तर दिवंगत माजी मंत्री पतंगराव कदम यांचे सुपुत्र विश्वजित कदम हेसुद्धा सांगलीतील पलुस कडेगाव मतदारसंघाचे आमदार आहेत. जयंत पाटील यांच्यावर टीका होताच ‘सांगली कनेक्शन’ असलेले त्यांचे मंत्रिमंडळ सहकारी विश्वजित कदम धावून आले.

‘दादा, कोरोनाचा साठीच्या वरील लोकांना अधिक धोका, काळजी घ्या’, जयंत पाटलांचा टोला

दरम्यान, ‘कोरोना’बाधित जिल्हे रेड झोनमध्ये समाविष्ट केल्याचे वृत्त विश्वजित कदमांनी फेटाळले. सांगली, मुंबई, पुणे, पालघर, औरंगाबाद यासह अन्य जिल्हे रेड झोनमध्ये समाविष्ट केलेत, ही खोटी बातमी आहे. केंद्र अथवा राज्य सरकारने असे कोणतेही झोन घोषित केले नसल्याचे विश्वजित कदम यांनी स्पष्टीकरण दिले.

14 तारखेनंतरही मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन घोषित केला आहे. अद्याप असे कोणत्याही प्रकारचे झोन सरकार अथवा शासनाकडून केले नाहीत, असं कदम यांनी म्हटलं आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाच्या प्रादुर्भावानुसार तीन झोनमध्ये विभागणी करणार असल्याचं सांगितलं होतं.

जयंत पाटील-चंद्रकांत पाटील यांच्यात शाब्दिक युद्ध

पहिला प्रहार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यपालनियुक्त आमदार होऊ शकत नाहीत यावरुन चंद्रकांत पाटील यांनी टीकेला सुरुवात केली होती. मुख्यमंत्री हे राज्यपाल कोट्यातून आमदार होऊ शकत नाही, घटनात्मकदृष्ट्या तसं होऊ शकत नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. (Vishwajit Kadam taunts Chandrakant Patil)

दुसरा पलटवार – जयंत पाटील यांनी विरोधीपक्षांना कोरोनाविरोधातील कामावर लक्ष देण्यास सांगितलं होतं. सगळा देश आणि महाराष्ट्र सध्या कोरोनाच्या विरोधात लढाई लढतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाऊन संदर्भातील धोरणे सर्वांशी चर्चा करून ठरवत आहेत. सर्व लोक त्यांना सहकार्य करत आहेत. अशा वेळी तुम्हाला राजकारण सुचते, याचे मला कौतुक वाटते, असं जयंत पाटील म्हणाले होते.

तिसरी टीका –  जयंत पाटलांच्या टीकेवर प्रत्युत्तर देत चंद्रकांत पाटलांनी भाजपच्या कार्यकर्त्यांच्या कामाचा पाढा वाचला. तसेच, कोरोना विरुद्धच्या लढाईत सहभागी व्हायचे आवाहन आम्हाला करण्यापेक्षा तुमच्या स्वत:च्या पक्षाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना त्याचप्रमाणे तुमच्या आघाडी सरकारमधील सहकारी पक्षांना करा, असा सल्लाही दिला होता.

चौथा हल्ला – “चंद्रकांतदादा, कोरोना आजाराचा साठीच्या वरील लोकांना अधिक धोका उद्भवतो. त्यामुळे, आपण जास्त बाहेर फिरु नका. स्वतःची काळजी घ्या. काही कमी जास्त लागल तर कळवा. मी आहेच ना आपल्या मदतीला. आपलाच, जयंत पाटील”, असं ट्विट जयंत पाटलांनी केलं होतं.

(Vishwajit Kadam taunts Chandrakant Patil)

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.