अब्दुल सत्तार यांची माघार, काँग्रेसला विरोध कायम, मदत कुणाला?

औरंगाबाद: काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी अखेर औरंगाबाद लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. धर्मनिरपेक्ष मतांचं विभाजन होऊ नये म्हणून मी माघार घेतली आहे. पण मी काँग्रेसचं काम करणार नाही असं अब्दुल सत्तार यांनी सांगितलं. त्याचबरोबर चंद्रकांत खैरे यांचा पराभव करणाऱ्या कुणालाही मदत करु शकतो असंही अब्दुल सत्तार यांनी म्हटलं. दरम्यान, सिल्लोड विधानसभा मतदारसंघातील आमदार अब्दुल […]

अब्दुल सत्तार यांची माघार, काँग्रेसला विरोध कायम, मदत कुणाला?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:04 PM

औरंगाबाद: काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी अखेर औरंगाबाद लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. धर्मनिरपेक्ष मतांचं विभाजन होऊ नये म्हणून मी माघार घेतली आहे. पण मी काँग्रेसचं काम करणार नाही असं अब्दुल सत्तार यांनी सांगितलं. त्याचबरोबर चंद्रकांत खैरे यांचा पराभव करणाऱ्या कुणालाही मदत करु शकतो असंही अब्दुल सत्तार यांनी म्हटलं.

दरम्यान, सिल्लोड विधानसभा मतदारसंघातील आमदार अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसचे औरंगाबादचे लोकसभा उमेदवार सुभाष झांबड यांना विरोध करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून काँग्रसने विधान परिषदेचे आमदार सुभाष झाम्बड यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर, सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार नाराज झाले. त्यांनी थेट काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देत, काँग्रेस पक्षातूनही बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांच्या भाजप नेत्यांशी भेटीगाठी सुरु झाल्या.

आमदार अब्दुल सत्तार यांनी काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच ‘वर्षा’ बंगल्यावर भेट घेतली. त्यामुळे काँग्रेसला राम राम ठोकून बाहेर पडलेले आमदार अब्दुल सत्तार भाजपमध्ये प्रवेश करणार का अशी चर्चा सुरु झाली होती.

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीकडून शिवसेनेचे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे, तर वंचित बहुजन आघाडीकडून आमदार इम्तियाज जलील रिंगणात आहेत. तर काँग्रेस-राष्ट्रवादीकडून काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार सुभाष झांबड लढत आहेत.

कोण आहेत अब्दुल सत्तार?

अब्दुल सत्तार हे औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार आहेत. गेल्या जवळपास 30 वर्षांपासून राजकारणात सक्रीय असून, 1984 साली ग्रामपचंयत निवडणुकीपासून त्यांनी राजकीय जीवनाची सुरुवात केली. सिल्लोड आणि परिसरात अब्दुल सत्तार यांची राजकीय ताकद मोठी आहे.

संबंधित बातम्या

आमदार अब्दुल सत्तार भाजपच्या वाटेवर?   

राशीतून चंद्रमा फिरतोय, चंद्रकांत खैरेंकडून दुसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल  

औरंगाबाद लोकसभा : कुणाकडे पैसा जास्त, कुणावर गुन्हे अधिक?  

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.