काँग्रेसला धक्का, लवकरच सोलापूरच्या एका आमदाराचा भाजपात प्रवेश?

आजचा दिवस विरोधीपक्षांसाठी चांगलाच अडचणीचा दिवस असल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी राष्ट्रवादीचं घड्याळ काढून शिवबंधन बांधल्यानंतर आता काँग्रेसलाही धक्का लागण्याची शक्यता आहे. आता काँग्रेसचेही सोलापूरमधील एक आमदार भाजपच्या वाटेवर आहेत.

काँग्रेसला धक्का, लवकरच सोलापूरच्या एका आमदाराचा भाजपात प्रवेश?
Follow us
| Updated on: Jul 25, 2019 | 2:05 PM

मुंबई : आजचा दिवस विरोधीपक्षांसाठी चांगलाच अडचणीचा दिवस असल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी राष्ट्रवादीचं घड्याळ काढून शिवबंधन बांधल्यानंतर आता काँग्रेसलाही धक्का बसण्याची शक्यता आहे. आता काँग्रेसचेही सोलापूरमधील एक आमदार भाजपच्या वाटेवर आहेत.

अक्कलकोटचे काँग्रेस आमदार सिद्धराम म्हेत्रे यांनी काही दिवसांपूर्वीच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मुंबईत येऊन भेट घेतली होती. तेव्हापासून त्यांच्या पक्षबदलाच्या चर्चेला सुरुवात झाली होती. आमदार म्हेत्रे हे सुशीलकुमार शिंदे यांचे निकटवर्तीय आहेत. म्हेत्रे यांना 2 दिवसांपूर्वीच आपल्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांना याबाबत कल्पना दिल्याचेही बोलले जात आहे. या बैठकीतूनही त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला जास्तच उधाण आलं होतं.

काही दिवसांपूर्वीच सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना विधानसभेपूर्वी मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत आमदार सिद्धराम म्हेत्रे यांचा भाजप प्रवेश होईल, असा दावा केला होता. आता तो खरा ठरताना दिसत आहे. यावेळी देशमुख यांनी आमदार सिद्धराम म्हेत्रे यांच्यासोबत सोलपूरमधील आजी-माजी आमदार, तालुकाध्यक्षही संपर्कात असल्याचे म्हटले होते.

कोण आहेत सिद्धराम म्हेत्रे?

  • सिद्धराम म्हेत्रे हे काँग्रेसचे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा निवडून आले आहेत
  • सोलापूरच्या राजकारणात सिद्धराम म्हेत्रे यांचा दबदबा आहे.
  • सिद्धराम म्हेत्रे हे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे अत्यंत जवळचे मानले जातात.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.