मी भाजपमध्ये प्रवेश करणार, पण एकच अट…: आमदार कालिदास कोळंबकर
मुंबई: नारायण राणेंचे कट्टर समर्थक आणि काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर हे भाजपच्या वाटेवर आहेत. येत्या काही दिवसात कालिदास कोळंबकर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. माझी कामं मुख्यमंत्र्यानी केली आहेत, त्यामुळे मी त्यांच्या पाठीशी आहे. फक्त नायगावमधील पोलिसांचा प्रश्न सुटला की मी भाजपमध्ये प्रवेश करेन, असं कालिदास कोळंबकर यांनी टीव्ही 9 मराठीला सांगितलं. मी इतकी वर्षे आमदार […]
मुंबई: नारायण राणेंचे कट्टर समर्थक आणि काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर हे भाजपच्या वाटेवर आहेत. येत्या काही दिवसात कालिदास कोळंबकर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
माझी कामं मुख्यमंत्र्यानी केली आहेत, त्यामुळे मी त्यांच्या पाठीशी आहे. फक्त नायगावमधील पोलिसांचा प्रश्न सुटला की मी भाजपमध्ये प्रवेश करेन, असं कालिदास कोळंबकर यांनी टीव्ही 9 मराठीला सांगितलं.
मी इतकी वर्षे आमदार आहे, पण स्थानिक लोकांचे मोठे प्रश्न सुटले नव्हते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते सोडवले. सेनेच्या अनेक नेत्यांसोबत माझे चांगले संबंध आहेत. माझा प्रवेश काही अटी शर्थी ठरला की होईल, असं आमदार कालिदास कोळंबकर म्हणाले.
कालिदास कोळंबकर कोण आहेत?
- कालिदास कोळंबकर हे मुंबईतील वडाळा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार आहेत.
- सलग सातवेळा ते विधानसभेवर निवडून आले आहेत.
- नारायण राणेंचे कट्टर समर्थक म्हणून कोळंबकर यांची ओळख आहे.
- नारायण राणेंसोबत त्यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
- राणेंसोबत आलेले सर्व आमदार शिवसेनेत परतले, मात्र केवळ कालिदास कोळंबकर हे काँग्रेसमध्येच राहिले. आता कालिदास कोळंबकर काँग्रेस सोडण्याच्या तयारीत आहेत.