महाराष्ट्रातील एकमेव काँग्रेस खासदाराचा मोदींविरोधात शड्डू, लोकसभेला आव्हान देण्याची तयारी

मी वाराणसीतून लोकसभा निवडणूक लढायला तयार आहे, असं काँग्रेस खासदार बाळू धानोरकर म्हणाले. (Balu Dhanorkar challenge Narendra Modi)

महाराष्ट्रातील एकमेव काँग्रेस खासदाराचा मोदींविरोधात शड्डू, लोकसभेला आव्हान देण्याची तयारी
Follow us
| Updated on: Jan 16, 2021 | 2:13 PM

नागपूर : काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात लोकसभा निवडणुकीला उतरण्याची तयारी दर्शवली आहे. पक्षाने आदेश द्यावा, मी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून लढायला तयार आहे, असं वक्तव्य बाळू धानोरकर यांनी केलं आहे. (Congress MP Balu Dhanorkar eager to challenge PM Narendra Modi in Varanasi)

गेल्या लोकसभा निवडणुकीत तयारीसाठी फक्त 15 दिवस मिळाले होते. आता तयारीला तीन वर्षे बाकी आहेत. पक्षाने आदेश द्यावा, मी वाराणसीतून लोकसभा निवडणूक लढायला तयार आहे, असं काँग्रेस खासदार बाळू धानोरकर म्हणाले.

कोण आहेत बाळू धानोरकर?

बाळू उर्फ सुरेश धानोरकर हे मूळचे काँग्रेसी नेते नाहीत. लोकसभा निवडणुकीत तिकीट मिळावं म्हणून बाळू धानोरकर यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. चंद्रपूरच्या जागेवर काँग्रेसने उमेदवार घोषित केला होता. मात्र, बाळू धानोरकरांसाठी काँग्रेसने उमेदवार बदलण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसला राज्यात केवळ एकाच जागेवर विजय मिळवता आला, ती म्हणजे चंद्रपूरची जागा.

केंद्रीय मंत्र्याचा पराभव करणारा जायंट किलर 

बाळू धानोरकर यांना काँग्रेसचं तिकीट मिळाल्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या आमदारकीचाही राजीनामा दिला. ते चंद्रपुरातील वरोरा विधानसभा मतदारसंघातून आमदार होते. केंद्रीय मंत्री असलेल्या हंसराज अहिर आणि शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेल्या बाळू धानोरकर यांच्यात ‘काँटे की टक्कर’ झाली. मात्र अखेर बाळू धानोरकर यांचा 45 हजारांच्या मताधिक्याने विजय झाला.

तीन वेळा खासदार आणि केंद्रीय मंत्रिपद भूषवलेल्या भाजप नेत्याला एका आमदाराने पराभवाची धूळ चारल्याने धानोरकर जायंट किलर ठरले होते. त्यामुळे बाळू धानोरकरांना थेट पंतप्रधानांना आव्हान देण्याचा विश्वास वाटत आहे.

पंतप्रधान मोदींचं विक्रमी मताधिक्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत वाराणसी मतदारसंघातून विजयी झाले. मोदींना तब्बल 6,74,664 मतं मिळाली होती. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी समाजवादी पक्षाच्या उमेदवार शालिनी यादव यांना 1,95,159 मतं मिळाली होती. मोदी तब्बल 4 लाख 79 हजार 505 मताधिक्याने विजयी झाले होते. तर काँग्रेसचे अजय राय तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते.

संबंधित बातम्या :

शिवसेनेतून आलेल्या बाळू धानोरकरांनी काँग्रेसची लाज राखली!

काँग्रेसच्या एकमेव खासदाराने करुन दाखवलं, यवतमाळ जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची खुर्ची समर्थकाला

(Congress MP Balu Dhanorkar eager to challenge PM Narendra Modi in Varanasi)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.