भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी एकेकाळी दिलेलं शपथपत्र कसं नाकारता?, राजीव सातव यांचा केंद्राला सवाल

भाजपच्या मुख्यमंत्र्यानं एकेकाळी दिलेल्या प्रतिज्ञापत्राला कसं नाकारू शकता, असा सवाल खासदार राजीव सातव यांनी विचारला. (Congress MP Rajiv Satav raised question on letter of Centre govt on Kanjurmarg)

भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी एकेकाळी दिलेलं शपथपत्र कसं नाकारता?, राजीव सातव यांचा केंद्राला सवाल
राजीव सातव, काँग्रेस
Follow us
| Updated on: Nov 03, 2020 | 3:28 PM

नवी दिल्ली : काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांनी कांजूरमार्गच्या जागेबाबत केंद्र सरकाने पाठवलेल्या पत्रावरुन भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. कांजूरमार्गची जमीन राज्य सरकारची आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ही जागा राज्य सरकारची आहे, असं सांगितलं आहे. भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी एकेकाळी दिलेल्या प्रतिज्ञापत्राला कसं नाकारू शकता, असा सवाल खासदार राजीव सातव यांनी विचारला. (Congress MP Rajiv Satav raised question on letter of Centre govt on Kanjurmarg)

महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात आल्यानंतर मागील वर्षापासून केंद्रांनं राज्य सरकराच्या कामात जेवढे अडथळे आणता येईल तितके आणण्याचा प्रयत्न केला, अशी टीका राजीव सातव यांनी केली. केंद्र सरकारने राज्य सरकारचा 40 हजार कोटींचा जीएसटीचा परतावा थकवला.

कोरोनाच्या काळात केंद्र सरकारने जी मदत करायला हवी होती ते देखील केले नाही. केंद्रानं टेस्ट किट आणि इतर साहित्याचा पुरवठा मुबलक प्रमाणात केला नाही.राज्यपाल कार्यालयाचा वापर केंद्र सरकारनं केला. राज्यातील भाजपनंही त्याचा वापर केला,अशी टीका खासदार राजीव सातव यांनी केली.

महाराष्ट्राचा विकास रोखला जावा, महाराष्ट्राचा विकासामध्ये अडथळे यावेत भाजपचा अजेंडा आहे. केंद्रातील भाजपच्या या अंजेड्याला राज्यातील भाजप मदत करतय.हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राला रोखायला कुणालाही जमणार नाही, असं राजीव सातव म्हणाले. भाजपचा मी म्हणेल तोच खरे हा अजेंडा आहे, असंही सातव यांनी सांगितले.

अस्लम शेख यांची भाजपवर टीका

भाजप आणि शिवसेनेचे सरकार असताना केंद्र सरकारने कांजूरमार्गची जागा त्यांची असल्याचे सांगितले नाही. कांजूरमार्गमधील प्रकल्प यशस्वी झाला तर त्यांची चूक समोर येईल, असा दावा वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी केला. कांजूरमार्गची जागा राज्याची आहे त्यावर काय करायचं याचा निर्णय घ्यायचा अधिकार राज्याला आहे. केंद्राच्या निर्णयात राज्य हस्तक्षेप करत नाही मग केंद्र काम रेटून घेण्याचा प्रयत्न का करत आहे?,असा सवाल अस्लम शेख यांनी विचारला.

संबंधित बातम्या:

‘मेट्रोचं काम थांबवण्यासाठी भाजपचं कटकारस्थान’, कारशेडच्या वादावरुन नवाब मलिकांचा गंभीर आरोप

हे तर महाराष्ट्राची कोंडी करण्याचं षडयंत्र; मेट्रोच्या वादात मुंबईच्या महापौरांची उडी

(Congress MP Rajiv Satav raised question on letter of Centre govt on Kanjurmarg)

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.