Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदी प्रचाराले आले पण हरलो नाही, आता काँग्रेसला नंबर 1 करणार, नाना पटोलेंचा दिल्लीत निर्धार

महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर नाना पटोले (Nana Patole) पहिल्यांदाच दिल्ली दरबारी पोहोचले आहेत.

मोदी प्रचाराले आले पण हरलो नाही, आता काँग्रेसला नंबर 1 करणार, नाना पटोलेंचा दिल्लीत निर्धार
Nana patole
Follow us
| Updated on: Feb 09, 2021 | 12:44 PM

नवी दिल्ली :  महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर नाना पटोले (Nana Patole) पहिल्यांदाच दिल्ली दरबारी पोहोचले आहेत. या दौऱ्यात ते काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Soniya Gandhi) यांची भेट घेतली. तत्पूर्वी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधताना काँग्रेसला राज्यात एक नंबरचा पक्ष बनविणार, यासाठी वाटेल ते कष्ट घेईल, असा निर्धार नवनियुक्त काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. (Congress Nana Patole Attacked Pm Modi over Farmer Agitation Delhi)

प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर नाना पटोले यांनी पहिल्यांदाच सोनिया गांधी यांची भेट घेतली. तसंच नाना पटोले यांनी राहुल गांधींची (Rahul Gandhi) भेट घेऊन राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. महाराष्ट्रात काँग्रेसचं संघटन अधिक मजबूत कसं करता येईल, येणाऱ्या काळात कोणते धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील, यासंबंधीची चर्चा झाल्याची माहिती पटोले यांनी दिली. तसंच मोदी प्रचाराले आले पण हरलो नाही, आता काँग्रेसला नंबर 1 करणार, असा निर्धार नाना पटोले यांनी केला.

“राजधानी नवी दिल्लीच्या सीमेवर गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी आंदोलन सुरु आहे. यावर बोलताना नाना पटोले यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र डागलं. मोदींनी काहीही बोललं तरी तो कायदा होतो पण दुसऱ्याने काही बोललं तर तो राष्ट्रद्रोह होतो. इंग्रज आणि मुघलांनी जेवढे अत्याचार केले नाहीत तेवढे अत्याचार आताचं विद्यमान सरकार शेतकऱ्यांवर करत आहेत”, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

“दिल्लीत शेतकऱ्यांचं अनेक दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. खरंतर केंद्र शासनाने आतापर्यंत त्यांचं म्हणणं ऐकून तोडगा काढायला हवा होता. परंतु तोडगा काढण्याऐवजी देशाचे पंतप्रधान शेतकऱ्यांना हिणवत आहेत. हे देशाच्या दृष्टीने नक्कीच भूषणावह बाब नाही”, अशी टीका पटोले यांनी केली.

नाना पटोले आणि नितीन राऊत एकाच वेळी सोनिया गांधींच्या भेटीला, चर्चेला उधाण

नवनियुक्त काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मंत्री नितीन राऊत हे एकाचवेळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीला दिल्लीला आहे आहेत. यानिमित्ताने  मंत्रिमंडळाच्या विस्ताराचीही चर्चा होत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासोबत नाना पटोले यांना मंत्रिपद मिळणार का?, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. यावर बोलताना मंत्रिपदाबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, असं नाना पटोले म्हणाले.

(Congress Nana Patole Attacked Pm Modi over Farmer Agitation Delhi)

हे ही वाचा :

नरेंद्र मोदी राज्यसभेत का भावूक झाले? मोदींना प्रणव मुखर्जींची आठवण का झाली?

गुलाम नबी आझाद यांना पराभूत करण्यात पवार अपयशी ठरतात तेव्हा; शरद पवारांनीच ऐकवला संसदेत किस्सा

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.