“भाजपने काँग्रेस आमदारांना पैसे देऊन विकत घेतलं”, नाना पटोलेंचा दावा
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर टीका केली आहे.
मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपवर टीका केली आहे. “भाजपने काँग्रेस आमदार पैसे देऊन विकत घेतलं”, असं नाना पटोले म्हणाले आहेत. पैसा आणि ईडीच्या जोरावर भाजप लोकशाही विकत घेत आहे. झारखंडमध्ये काँग्रेस (Congress) आणि मुक्ती मोर्चाचं सरकार पाडण्यासाठी काँग्रेसचे आमदार पैसे देऊन विकत घेतलं. त्यांच्यावर दबाव टाकला, असं नाना पटोले म्हणालेत.