कोण कितीही पावरफुल असो, सत्ता नसली की लोक विसरतात : शिवेंद्रराजे भोसले

विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीला (Congress-NCP) भगदाड पडलं आहे. अनेक दिग्गजांनी भाजप आणि शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. Congress NCP 4 MLA resigns : Shivendra raje bhonsale and sandeep naiks reaction

कोण कितीही पावरफुल असो, सत्ता नसली की लोक विसरतात : शिवेंद्रराजे भोसले
Follow us
| Updated on: Jul 30, 2019 | 1:58 PM

मुंबई : विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीला (Congress-NCP) भगदाड पडलं आहे. अनेक दिग्गजांनी भाजप आणि शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. तर अनेक बडे नेते प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या (Congress-NCP) तब्बल 4 आमदारांनी आज विधानभवनात जाऊन आमदारकीचे राजीनामे दिले.

“कोण कितीही पावरफुल असलं तरी सत्ता नसेल तर तुम्हाला लोक विसरतात. आजची राजकीय परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे मतदारसंघातील लोकांची कामं व्हावीत म्हणून भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला”, असं राष्ट्रवादीचा राजीनामा दिलेले आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितलं.

शिवेंद्रराजे भोसले यांनी आज सकाळी आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला.

“मी राष्ट्रवादीकडे जागा मागितली नव्हती त्यामुळे माझी राष्ट्रवादीकडून लढण्याची इच्छा नाही, असे संकेत मी दिले होते. पवार साहेबांना भेटून माझी अडचण सांगितली. त्यांनी मार्ग काढू म्हंटल पण मी निर्णय घेतला आहे” असं शिवेंद्रराजे म्हणाले. मी उद्या गरवारे क्लबमध्ये भाजपमध्ये प्रवेश करतोय, अशी घोषणा शिवेंद्रराजे यांनी केली.

नवी मुंबईचा विकास हेच ध्येय : संदीप नाईक

नवी मुंबईचा विकास हेच माझं ध्येय आहे. कुठल्याही प्रकारे आमच्या वर्चस्वासाठी हा प्रवेश नाही, असं नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक यांनी राजीनाम्यादरम्यान सांगितलं.

माझ्या कुटुंबीयांचं मला माहित नाही, पण मी राजीनामा दिला. माझ्यावर कोणीही दबाव टाकलेला नाही. नागरिक, समर्थक सगळ्यांचे मत आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विकास करणारे नेतृत्व आहे. आमच्या परिवाराने मला निर्णय घ्यायचा अधिकार दिला, असं संदीप नाईक म्हणाले.

कालिदास कोळंबकर

“मी कोणाच्या दबावाला घाबरत नाही. मी भाजपत जाणार ते माझ्या मतदारसंघातल्या कामासाठी. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, कोणाला घाबरत नाही. लोकांची कामं, विकास होणं महत्त्वाचं आहे” असं कालिदास कोळंबकर म्हणाले.

कोणावरही दबाव नाही : गिरीश महाजन

दरम्यान, कोणावरही दबाव आणला जात नाही. त्यांना माहितीय आपले भविष्य आता भाजपच्या हातात आहे. राष्ट्रवादी पक्ष आता फक्त पवार कुटुंबियांपुरता मर्यादित राहिला आहे, लवकरच त्यांच्यातले अजून नेते येतील. घराणेशाहीला कंटाळून लोक येत आहेत, असं भाजप नेते गिरीश महाजन म्हणाले.

संबंधित बातम्या 

राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसलेंचा राजीनामा  

शिवेंद्रराजेंनी उमेदवारी अर्जच भरला नाही, अजित पवारांच्या दौऱ्याकडेही पाठ    

शरद पवार वाद मिटवणार, शिवेंद्रराजे आणि उदयनराजेंना एकत्र बसवून तोडगा काढणार  

जिथे हित असेल तिथे मी जाणार, आमदार शिवेंद्रराजे भोसलेंचं सूचक विधान    

शरद पवार म्हणाले शिवेंद्रराजे पक्षातच, पण काही तासातच भाजप प्रवेशाच्या हालचाली 

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.