काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे महत्वाचे मंत्री वर्षा बंगल्यावर, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय होणार?
आज मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे महत्वाचे मंत्री आणि नेते दाखल झाले आहेत. या बैठकीत गृहमंत्र्यांवरील आरोपाबाबत महत्वपूर्ण चर्चेची शक्यता आहे.
मुंबई : परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बमुळे राज्याच्या राजकारणात उठलेलं वादळ अद्याप शमलेलं नाही. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर भाजप ठाम आहे. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कुठल्याही चौकशीची गरज नसल्याचं सांगत गृहमंत्र्यांना क्लीन चिट दिली आहे. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे महत्वाचे मंत्री आणि नेते दाखल झाले आहेत. या बैठकीत गृहमंत्र्यांवरील आरोपाबाबत महत्वपूर्ण चर्चेची शक्यता आहे.(Congress, NCP and Shiv Sena leaders meet at CM Uddhav Thackeray’s Varsha residence)
काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचे कोणते मंत्री उपस्थित?
उमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह जयंत पाटील, अनिल देशमुख, दिलीप वळसे-पाटील, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे मंत्री आणि नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, नाना पटोले, शिवसेनेचे मंत्री दादा भुसे, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, अनिल परब हे वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात येत आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घ्यायचा की नाही? या बाबत या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर CDR प्रकरणात रश्मी शुक्ला यांच्यावर काय कारवाई करता येईल, याबाबतही या बैठकीत चर्चा होऊ शकते.
तत्पूर्वी आज राज्य मंत्रीमंडळाची महत्वाची बैठक झाली. या बैठकीत राज्यात विविध प्रश्नांसह कोरोना स्थितीवरही चर्चा झाल्याचं कळतंय. राज्यात सातत्याने वाढत असलेली कोरोना रुग्णांची संख्या ही चिंताजनक बाब बनत चालली आहे. अशा स्थितीत काही शहरांमध्ये लॉकडाऊन आणि अधिक कठोर निर्बंध लावण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाऊ शकतो, असे संकेत खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले होते.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले.
— Shivsena Communication (@ShivsenaComms) March 24, 2021
मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय
>> महाराष्ट्र आरोग्य सेवा गट-अ मधील पद्व्युत्तर पदविका व पदवी धारण करणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रोत्साहनपर वेतनवाढ – सार्वजनिक आरोग्य विभाग
>> राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयातील थेट नियुक्त प्राचार्यांच्या वेतन निश्चितीस मान्यता- उच्च व तंत्रशिक्षण
>> सर्व महसुली विभागांत अधिकाऱ्यांच्या रिक्त जागा समप्रमाणात भरणार. सरळसेवा व पदोन्नतीने नियुक्तीसाठी महसुली विभाग वाटप नियम 2021 ही नवीन अधिसूचना काढणार- सामान्य प्रशासन
>> गौण खनिजावरील स्वामित्वधनाच्या व डेड रेंट दरात सुधारणा करण्याचा निर्णय- महसूल
>> सारथी संस्थेस शिवाजीनगर पुणे येथे शासकीय जागा – महसूल
>> पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालय संस्थेस पुणे जिल्ह्यातील चिखली येथे विस्तार केंद्रासाठी जागा- उच्च व तंत्रशिक्षण
>> रत्नागिरी येथे नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय. शिक्षक व कर्मचाऱ्यांची पदे भरण्यास मंजुरी- उच्च व तंत्रशिक्षण विभाग
>> अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील काटेपूर्णा बॅरेज प्रकल्पास सुधारित मान्यता
संबंधित बातम्या :
मुंबई पोलीस आयुक्त गृहमंत्र्यांच्या भेटीला, बदल्यांच्या दुसऱ्या राऊंडविषयी चर्चेची शक्यता
परमबीर सिंग प्रकरण भविष्यात भाजपवरच उलटल्याशिवाय राहणार नाही : संजय राऊत
Congress, NCP and Shiv Sena leaders meet at CM Uddhav Thackeray’s Varsha residence