काँग्रेस–राष्ट्रवादीच्या चार आमदारांचे राजीनामे

विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीला (Congress-NCP) भगदाड पडलं आहे. अनेक दिग्गजांनी भाजप आणि शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे.

काँग्रेस–राष्ट्रवादीच्या चार आमदारांचे राजीनामे
Follow us
| Updated on: Jul 30, 2019 | 3:14 PM

मुंबई : विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीला (Congress-NCP) भगदाड पडलं आहे. अनेक दिग्गजांनी भाजप आणि शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. तर अनेक बडे नेते प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीचे (Congress-NCP) तब्बल 4 आमदार राजीनाम्यासाठी विधानभवनात दाखल झाले.

साताऱ्याचे राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendra Raje Bhonsle) यांनी सर्वात आधी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास राजीनामा दिला. त्यानंतर अहमदनगरमधील राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड (Vaibhav Pichad), मुंबईच्या वडाळा येथील काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर (Kalidas Kolambkar) हे भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या उपस्थितीत राजीनामा देण्यासाठी विधान भवनात आले.

याशिवाय नवी मुंबईचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक (Sandeep Naik) हे सुद्धा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या गाडीने विधानभवन येथे दाखल झाले.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमधून इनकमिंग-आऊट गोईंग होत आहे. सत्ताधारी भाजप-शिवसेनेत इनकमिंग होत आहे, तर विरोधातील काँग्रेस-राष्ट्रवादीतून मोठ्या प्रमाणात आऊट गोईंग होत आहे.

नुकतंच राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने, राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. त्यातच आता शिवेंद्रराजे भोसले, वैभव पिचड आणि संदीप नाईक हे सुद्धा पक्ष सोडणार असल्याने, या धक्क्यांमध्ये वाढ होत आहे.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.