शुक्रवारी महासेनाआघाडीची एकत्र चर्चा, सत्तास्थापनेवर अंतिम निर्णय : पृथ्वीराज चव्हाण
शुक्रवारी (22 नोव्हेंबर) महासेनाआघाडीची एकत्र बैठक होणार असल्याची माहिती काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी (Congress NCP Shivsena Meeting) दिली.
नवी दिल्ली : राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा लवकरच सुटणार असल्याची चिन्हं दिसू लागली (Congress NCP Shivsena Meeting) आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या साडे पाच तासाच्या बैठकीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने चर्चा सकारात्मक दिशेने सुरु आहे असे (Congress NCP Shivsena Meeting) सांगितले. या बैठकीनंतर परवा म्हणजेच शुक्रवारी (22 नोव्हेंबर) महासेनाआघाडीची एकत्र बैठक होणार असल्याची माहिती काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी (Congress NCP Shivsena Meeting) दिली.
पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, “आज (20 नोव्हेंबर) काँग्रेस राष्ट्रवादीची बैठक झाली. या बैठकीत सत्तास्थापनेवर सकारात्मक चर्चा झाली. दरम्यान उद्या (21 नोव्हेंबर) काँग्रेस आणि राष्ट्रवादीची स्वतंत्र बैठक होईल. त्यानंतर दुपारी 2 च्या सुमारास काँग्रेस-राष्ट्रवादीची एकत्रित बैठक होईल. या बैठकीनंतर संध्याकाळच्या सुमारास काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते मुंबईसाठी रवाना होतील. यानंतर शुक्रवारी (22 नोव्हेंबर) शिवसेनेसोबत अंतिम चर्चा होईल. या चर्चेनंतर त्यावर अंतिम निर्णय घेतला जाईल.”
दरम्यान आज महाराष्ट्रातील सत्तास्थापनेबाबत दिल्लीत वेगवान घडामोडी घडल्या. काँग्रेस नेत्यांनी सोनिया गांधी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर सर्व काँग्रेस नेते बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाले. संध्याकाळी पाच वाजता या बैठकीला सुरुवात झाली. जवळपास साडे पाच तास या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली.
या बैठकीनंतर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत याबाबतची माहिती दिली. “महाराष्ट्रामध्ये गेल्या 21 दिवसांपासून जी अस्थिरता चालली आहे. ती संपवण्याकरिता आणि राज्याला स्थिर सरकार देण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची चर्चा झाली. चर्चा सकारात्मक झाली मात्र अजूनही चर्चा सुरु आहे.” असे पृथ्वीराज चव्हाण (Congress-NCP meeting on Maharashtra Government formation) म्हणाले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीदरम्यान सतत शिवसेना नेत्यांशी संपर्क सुरु होता. तसेच जे काही निर्णय या बैठकीत घेतले जात होते, तेही शिवसेनेला सांगितलं जातं होते.
दिल्लीत झालेल्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या बैठकीला राष्ट्रवादीकडून अध्यक्ष शरद पवार, प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील, सुनील तटकरे, अजित पवार, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, नवाब मलिक तर काँग्रेसकडून मल्लिकार्जुन खर्गे, अहमद पटेल, जयराम रमेश, सी वेणुगोपाल, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, नसीम खान असे एकूण 15 जणांनी चर्चा केली.