विदर्भातील 10 पैकी 9 जागा जिंकू, गडकरींचा पराभव निश्चित : विजय वडेट्टीवर
मुंबई : विदर्भात काँग्रेस-राष्ट्रवादी पाच जागा जिंकत आहे, अशी चर्चा भाजपच्या गोटात सुरु आहे. आम्ही तर नऊ जागांबाबत कॉन्फिडन्ट अर्थात 9 जागा मिळतील असा आम्हाला विश्वास आहे. इतकंच नाही तर भाजप नेते नितीन गडकरी यांचा पराभव निश्चित आहे, असा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. काँग्रेसची आज लोकसभा […]
मुंबई : विदर्भात काँग्रेस-राष्ट्रवादी पाच जागा जिंकत आहे, अशी चर्चा भाजपच्या गोटात सुरु आहे. आम्ही तर नऊ जागांबाबत कॉन्फिडन्ट अर्थात 9 जागा मिळतील असा आम्हाला विश्वास आहे. इतकंच नाही तर भाजप नेते नितीन गडकरी यांचा पराभव निश्चित आहे, असा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.
काँग्रेसची आज लोकसभा आढावा बैठक होती. या बैठकीत राज्यातील लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा घेण्यात आला. यावेळी विदर्भातील दहा जागांचा आढावाही घेण्यात आला. या बैठकीनंतर विजय वडेट्टीवार यांनी या 10 पैकी तब्बल 9 जागा जिंकू असा विश्वास व्यक्त केला.
‘नाना पटोले जिंकणार’
यावेळी वडेट्टीवार यांनी 9 जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त करताना, नितीन गडकरी यांचा पराभव निश्चित असल्याचा दावा केला. नितीन गडकरींविरोधात नागपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने नाना पटोले यांना मैदानात उतरवलं आहे. नाना पटोले हे नितीन गडकरींचा पराभव करतील, असा दावा वडेट्टीवार यांनी केला.
विदर्भ विभागात नागपूर, रामटेक,भंडारा-गोंदिया,गडचिरोली-चिमूर,चंद्रपूर,यवतमाळ-वाशिम, बुलडाणा,अकोला,अमरावती आणि वर्धा हे दहा मतदारसंघ येतात. या दहापैकी 9 जागांवर काँग्रेसने दावा केला आहे. विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र 2014 च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपने विदर्भातील सर्व 10 जागा जिंकल्या होत्या.