Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसची उमेदवारी जाहीर; अभिजीत वंजारी, जयंत आसगावकरांना तिकीट

नागपूर पदवीधर निवडणुकीसाठी काँग्रेसकडून अभिजीत वंजारी यांना उमेदवारी देण्यात आली आहे,

पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसची उमेदवारी जाहीर; अभिजीत वंजारी, जयंत आसगावकरांना तिकीट
Follow us
| Updated on: Nov 11, 2020 | 3:57 PM

नवी दिल्ली : राज्यातील 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघांचा निवडणूक कार्यक्रम गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात आला. 1 डिसेंबरला त्यासाठी मतदान पार पडणार आहे. त्यापैकी नागपूर पदवीधर निवडणुकीसाठी काँग्रेसकडून अभिजीत वंजारी (Abhijeet Vanjari) यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघातून जयंत आसगावकर (Jayant Asgaonkar) यांना काँग्रेसने तिकीट दिलं आहे.

कधीकाळी भाजपचे दिग्गज नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी प्रतिनिधित्व केलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून अभिजीत वंजारी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून संदीप जोशींच नाव जाहीर करण्यात आलं आहे.

काँग्रेसकडून प्राध्यापक बबनराव तायवाडे यांनी नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपला दोन वेळा टक्कर देण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश मिळालं नाही. त्यामुळे आता तरुण दमाचे अभिजित वंजारी यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. वंजारी आणि त्यांचे कार्यकर्ते सध्या निवडणुकीची जोरदार तयारी करत आहेत.

पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघातून जयंत आसगावकर यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. पुणे शिक्षक मतदार संघात पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश असून, येथे 1 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.

भाजपचे विद्यमान आमदार अनिल सोले हे दोन वेळा या मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यामुळे आता नव्या उमेदवाराला संधी देण्याची मागणी भाजपच्या युवा कार्यकर्त्यांकडून होत होती. त्यानंतर संदीप जोशी यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, संदीप जोशी यांनी यापूर्वीच आपण महापालिका निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं आहे.

संबंधित बातम्या

चंद्रशेखर बावनकुळेंवर नागपूर पदवीधर मतदारसंघाची जबाबदारी; भाजपकडून घोषणा

महापालिका निवडणुकीतून माघार, नागपूरचे महापौर आता पदवीधर मतदारसंघाच्या शर्यतीत

(Congress nominates Abhijeet Vanjari for Nagpur graduate election and Jayant Asgaonkar for Pune division teachers Constituency)

IPL बघणं महागात पडलं; एसटी प्रशासनाने चालकाला थेट बडतर्फच केलं
IPL बघणं महागात पडलं; एसटी प्रशासनाने चालकाला थेट बडतर्फच केलं.
'.. तर गावबंदी करू', मल्हार सर्टिफिकेटला जेजूरीच्या ग्रामस्थांचा विरोध
'.. तर गावबंदी करू', मल्हार सर्टिफिकेटला जेजूरीच्या ग्रामस्थांचा विरोध.
'मला शरद पवारांनी मंत्री केलं..', खतगावकरांचं अजितदादांसमोरच विधान
'मला शरद पवारांनी मंत्री केलं..', खतगावकरांचं अजितदादांसमोरच विधान.
'तो आमचा विठ्ठल..' धाराशीवात खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला
'तो आमचा विठ्ठल..' धाराशीवात खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला.
संचारबंदी निघाली, नागपूरकरांनी 6 दिवसांनी घेतला मोकळा श्वास
संचारबंदी निघाली, नागपूरकरांनी 6 दिवसांनी घेतला मोकळा श्वास.
एक खोक्याभाई काय घेऊन बसले.. , राज ठाकरेंची सरकारवर सडेतोड टीका
एक खोक्याभाई काय घेऊन बसले.. , राज ठाकरेंची सरकारवर सडेतोड टीका.
मराठवाड्यात पाणी टंचाईचं सावट; लवकरच करावा लागणार पाणीबाणीचा सामना
मराठवाड्यात पाणी टंचाईचं सावट; लवकरच करावा लागणार पाणीबाणीचा सामना.
मनसेच्या पहिल्या मुंबई अध्यक्षांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल
मनसेच्या पहिल्या मुंबई अध्यक्षांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार.
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल.