…म्हणून काँग्रेसचा पराभव होतोय; खरेगेंनी राहुल गांधींसमोरच नेत्यांना सुनावलं, सांगितलं महत्त्वाचं कारण

हरियाणा आणि महाराष्ट्रात झालेल्या पराभवानंतर आता काँग्रेस नेत्यांकडून पराभवाच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.

...म्हणून काँग्रेसचा पराभव होतोय; खरेगेंनी राहुल गांधींसमोरच नेत्यांना सुनावलं, सांगितलं महत्त्वाचं कारण
mallikarjun kharge
Follow us
| Updated on: Nov 29, 2024 | 6:45 PM

लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसनं चांगली कामगिरी केली होती.काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीमध्ये 99 जागा जिंकल्या होत्या. या जागा भाजपच्या तुलनेत खूप कमी असल्या तरी राजकीय तज्ज्ञांच्या मते काँग्रेसचं हे दमदार पुनरागमन मानलं गेलं. मात्र त्यानंतर झालेल्या हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मात्र काँग्रेसचा मोठा पराभव झाला.महाराष्ट्रात तर काँग्रेसला केवळ 16 जागाच जिंकता आल्या.हरियाणा आणि महाराष्ट्रात झालेल्या पराभवानंतर आता काँग्रेस नेत्यांकडून पराभवाच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. काँग्रेस कार्यकारीणीच्या बैठकीमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पराभवाचं कारण सांगितलं आहे. काँग्रेसच्या पराभवाला नेत्यांची बेताल वक्तव्य आणि एकतेचा अभाव हे कारणीभूत असल्याचं खरगे यांनी म्हटलं आहे. या बैठकीला काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियकां गांधी यांची देखील उपस्थिती होती.सोबतच अजून वेळ गेलेली नाही, असा सल्ला देखील या बैठकीमध्ये खरगे यांनी आपल्या नेत्यांना दिला आहे.

नेमकं काय म्हणाले खरगे?

या बैठकीमध्ये बोलताना खरगे यांनी म्हटलं की, लोकसभा निवडणुकीमध्ये आपण चांगली कामगिरी केली होती.त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये देखील एक वेगळा उत्साह होता. मात्र त्यानंतर तीन राज्यात निवडणुका झाल्या तिथे आपल्याला जी अपेक्षा होती त्या अपेक्षेप्रमाणे यश मिळालं नाही. इंडिया आघाडीनं चार पैकी दोन राज्यांमध्ये सरकार स्थापन केलं मात्र त्यामध्ये काँग्रेसची कामगिरी अपेक्षेपेक्षा खूपच कमी होती.मी पुन्हा पुन्हा हेच सांगतो. आपल्या पराभवाची दोनच कारणं आहेत, त्यापैकी सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे पक्षात असलेला एकजुटीचा अभाव आणि दुसरं कारण म्हणजे काँग्रेसमध्ये सुरू असलेला अंतर्गत वाद, एकमेकांविरोधात देण्यात येणारी स्टेटमेंट , यामुळे पक्षाचं मोठं नुकसान होत आहे, जर हे वेळीच थांबवलं गेलं नाही तर याचा मोठा फटका हा आपल्या पक्षाला बसू शकतो.

पुढे बोलताना खरगे यांनी म्हटलं की, ज्या राज्यात आपला पराभव झाला तिथे आपली संघटना म्हणावी तेवढी मजबूत नाहीये. आपल्याला त्या राज्यात आपलं संघटन मजबूत करण्याची गरज आहे. तळागाळातील कार्यकर्त्यांची एक मजबूत मोट आपल्याला बांधावी लागणार आहे.सोबतच त्या -त्या राज्यात असलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यांकडे देखील आपल्या दुर्लक्ष करून चालणार नाही, तेथील स्थानिक मुद्दे आपल्या लक्षात घ्यावे लागतील, त्या पार्श्वभूमीवर प्रचाराची रूपरेषा तयार करावी लागेल.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.