… तर यंदाचा पंतप्रधान महाराष्ट्रातून?

मुंबई : महाराष्ट्रातून पंतप्रधान केव्हा होणार हा प्रश्न नेहमीच विचारला जातो. पण यंदा पंतप्रधान महाराष्ट्रातून दिला जाणार का असा प्रश्न निर्माण झालाय. कारण, यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी महाराष्ट्रातून उभे राहणार आहेत. यावेळी लढाई ही पुन्हा एकदा रागा विरुद्ध नमो अशीच होणार आहे. मात्र ती त्याही पेक्षा आता खास झाली आहे. कारण राहुल […]

... तर यंदाचा पंतप्रधान महाराष्ट्रातून?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:35 PM

मुंबई : महाराष्ट्रातून पंतप्रधान केव्हा होणार हा प्रश्न नेहमीच विचारला जातो. पण यंदा पंतप्रधान महाराष्ट्रातून दिला जाणार का असा प्रश्न निर्माण झालाय. कारण, यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी महाराष्ट्रातून उभे राहणार आहेत.

यावेळी लढाई ही पुन्हा एकदा रागा विरुद्ध नमो अशीच होणार आहे. मात्र ती त्याही पेक्षा आता खास झाली आहे. कारण राहुल गांधीही मोदींप्रमाणे दोन लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, यासाठी पक्षाचं थिंक टँक कामाला लागलंय आणि अमेठी व्यतिरिक्त राहुल गांधी यांनी आणखी एका मतदारसंघातून निवडणूक लढावी अशी रणनीती आखली जात आहे. वाचा – नांदेड लोकसभा : अशोक चव्हाणांची यंदा मुख्यमंत्रीपदासाठी बॅटिंग

यामध्ये अमेठी सोबत महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातला नांदेड हा लोकसभा मतदारसंघ जवळपास निश्चित करण्यात आला. नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. मोदी लाटेतही काँग्रेसने आणि पर्यायाने विद्यमान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नांदेड अबाधीत ठेवला आणि ते निवडून आले. शिवाय 1980 पासून हा मतदारसंघ काँग्रेसच्याच ताब्यात आहे. केवळ 1989 डॉ. व्यंकटेश कबडे (जनता दल) आणि 2004 दिगंबर पाटील (भाजप) ला सोडलं तर आजपर्यंत काँग्रेसचाच हा गड राहिला आहे. वाचानांदेडमध्ये लोकसभेसाठी ‘भावोजी विरुद्ध मेहुणा’ लढत?

आता पंतप्रधान मोदींना टक्कर देण्यासाठी राहुल गांधीही दोन मतदारसंघासह उतरणार आहेत. राहुल गांधी हे अशोक चव्हाण यांच्या बालेकिल्ल्यातून निवडणूक लढवणार म्हणून अशोक चव्हाण यांची महाराष्ट्राच्या राजकारणात कॉलर जरा टाईट झाली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी महाराष्टातून निवडणूक लढवणार असतील तर महाराष्ट्राच्या काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये यामुळे उत्साह नक्कीच वाढेल. पण दोन मतदारसंघातून आणि भाजपशासित राज्यातून निवडणूक लढवत राहुल गांधी यांनी दोन हात करण्याचाच संदेश दिलाय.

देशाच्या इतिहासात 11 पंतप्रधान उत्तर प्रदेशातून

पंडित जवाहरलाल नेहरु – फुलपूर, उत्तर प्रदेश

लाल बहादूर शास्त्री – अलाहाबाद, उत्तर प्रदेश

इंदिरा गांधी – रायबरेली, उत्तर प्रदेश

मोरारजी देसाई – सुरत, गुजरात

चरण सिंह – बाघपत, उत्तर प्रदेश

इंदिरा गांधी – मेदक, उत्तर प्रदेश

राजीव गांधी – अमेठी, उत्तर प्रदेश

विश्वनाथ प्रताप सिंह – फतेहपूर, उत्तर प्रदेश

चंद्रशेखर – बल्लिया, उत्तर प्रदेश

नरसिम्हा राव – नांदयाल, आंध्र प्रदेश

अटल बिहारी वाजपेयी – लखनौ, उत्तर प्रदेश

एच. डी. देवेगौडा – राज्यसभा खासदार, कर्नाटक

इंदर कुमार गुजराल – राज्यसभा खासदार, बिहार

अटल बिहारी वाजपेयी – लखनौ, उत्तर प्रदेश

मनमोहन सिंह – राज्यसभा खासदार, आसाम

नरेंद्र मोदी – वाराणसी, उत्तर प्रदेश

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.