Sonia Gandhi | सोनिया गांधींची आज पुन्हा ED चौकशी, संसदेत काँग्रेस नेते निषेध नोंदवणार
National Herold case | नॅशनल हेरॉल्ड घोटाळा प्रकरणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची आज पुन्हा ईडीद्वारे चौकशी होणार आहे. दुपारी त्या चौकशीसाठी पोहोचतील.
नवी दिल्लीः नॅशनल हेरॉल्ड (National Herold) वृत्तपत्राशी संबंधित कथित मनी लाँड्रिंगचा आरोप असलेल्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) आज दुपारी पुन्हा एकदा ईडीच्या चौकशीला (ED Enquiry) सामोरे जाण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी सोनिया गांधी ईडीच्या चौकशीसाठी पोहोचतील. सोमवारीच त्यांना बोलावण्यात आले होते, मात्र ही तारीख एक दिवस पुढे ढकलण्यात आली होती. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ईडीसमोर आपला जबाब नोंदवण्यासाठी सोनिया गांधी दुपारी येतील. यापूर्वी 21 जुलै रोजी ईडीने त्यांनी सलग दोन तास चौकशी केली होती. त्यावेळी त्यांनी एजन्सीच्या कमीत कमी 28 प्रस्नांवा उत्तरं दिलं होती. नॅशनल हेरॉल्डचा मालकी हक्क असलेल्या यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेत कथित आर्थिक अनियमितता झाल्याप्रकरणी सोनिया गांधी यांची चौकशी सुरु आहे. दरम्यान, संसदेबाहेर काँग्रेस नेते या कारवाईचा विरोध करणार आहेत. तसेच संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. त्यामुळे अधिवेशनातदेखील काँग्रेस नेते मोदी सरकारवर या मुद्द्यावरून जोरदार टीका करणार आहेत.
‘राजकीय सूडापोटी चौकशी’
सोनिया गांधींच्या ईडी चौकशीविरोधात अनेक काँग्रेस नेत्यांनी निषेध व्यक्त केला आहे. राजकीय सूडापोटी ही कारवाई सुरु असल्याचा आरोप त्यांनी केलाय. 2013 मध्ये भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी दिलेल्या तक्रारीनंतर यंग इंडियन विरोधात कनिष्ठ न्यायालयाने आयकर विभागाकडून या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर मागील वर्षी काही आर्थिक अनियमिततेची तक्रार दाखल झाल्यानंतर गांधी कुटुंबियांची ईडीमार्फत चौकशी सुरु झाली आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यंग इंडियनच्या शेअरधारकांमध्ये सहभागी आहेत. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी या दोघांचेही यात 38% शेअर्स आहेत.
Sonia Gandhi to appear before ED for 2nd round of questioning today
Read @ANI Story | https://t.co/9ZgqaDKrBS#SoniaGandhi #Congress #NationalHeraldCase #EnforcementDirectorate pic.twitter.com/6WuEtsw99r
— ANI Digital (@ani_digital) July 26, 2022
संसदेत आणि बाहेरही विरोध दर्शवणार
सोनिया गांधींच्या ईडी चौकशीविरोधात काँग्रेसचे खासदार संसदेत आणि संसदेच्या बाहेरी विरोध दर्शवणार आहेत. सोमवारी पक्षाच्या मुख्यालयात काँग्रेस महासचिव, पक्षाचे प्रदेश प्रभारी आणि खासदारांची बैठक झाली. त्यावर पुढील रणनीतीवर चर्चा झाली. काँग्रेसचे महासचिव के सी वेणुगोपाल म्हणाले, काँग्रेसला राजघाटावर ‘सत्याग्रह’ करायचा होता. मात्र त्यांना पोलिसांनी परवानगी नाकारण्यात आली. तेथे कलम 144 लागू करण्यात आले. ते म्हणाले, मोदी सरकार आम्हाला झुकवू शकत नाही… संसदेत आम्ही यावरून तीव्र विरोध प्रदर्शित करू, असा इशारा वेणुगोपाल यांनी दिला.