शरद पवारांनी पंतप्रधानपदाचे उमेदवार व्हावे, काँग्रेसची गळ?

शरद पवारांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी केंद्रीय स्तरावर महाआघाडी करण्याची मागणी विरोधीपक्षांनी केली

शरद पवारांनी पंतप्रधानपदाचे उमेदवार व्हावे, काँग्रेसची गळ?
Follow us
| Updated on: Dec 10, 2020 | 12:24 PM

नवी दिल्ली : महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी एकत्र आलेल्या शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी या भिन्न विचारसरणीच्या पक्षांचं वर्षभरात चांगलंच गूळपीठ जमल्याचं पाहायला मिळालं. ठाकरे सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त तिन्ही पक्षांनी पाचच नव्हे, तर पंचवीस वर्ष सत्तेत एकत्र राहण्याचा मानस बोलून दाखवला. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय स्तरावरही अशाच प्रकारे विरोधी पक्षांशी मोट बांधली जावी, यासाठी काँग्रेसने गळ घातली आहे. विशेष म्हणजे शरद पवारांना पंतप्रधानपदाचा उमेदवार करण्याचीही त्यांची तयारी आहे. (Congress proposes Sharad Pawar to contest for PM candidature)

शरद पवार यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रासारखी महाविकास आघाडी केंद्रीय स्तरावर करण्याची मागणी केली जात आहे. काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी या संबंधीचा प्रस्ताव शरद पवार यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विरोधी पक्षाला एकत्र करुन आगामी लोकसभा निवडणुकीचं नेतृत्व करावं, असा प्रस्ताव काँग्रेसने दिला आहे.

पवारांना पंतप्रधानपदाचा उमेदवार करण्याची मागणी

शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कृषी कायदा रद्द करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर शरद पवार यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करण्याची तयारीही काँग्रेससह अनेक विरोधी पक्ष करत आहेत, अशी माहिती विरोधीपक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिली. विरोधी पक्षांचे नेते अमेरिकेतील जो बायडन थेरपी भारतात लागू करण्याची तयारी करत आहेत.

लोकसभा निवडणुकांना साडेतीन वर्षांचा अवकाश

पुढील लोकसभा निवडणुका 2023 मध्ये होणार आहेत. म्हणजेच साडेतीन वर्षांचा अवकाश आहे. साधारण सहा महिने ते एक वर्ष आधीपासून निवडणुकांची मोर्चेबांधणी सुरु होते. मात्र गेली सहा वर्ष सत्तेपासून दूर राहिलेली काँग्रेस आतापासूनच तयारीला लागलेली दिसते. गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधी यांना काँग्रेसकडून पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट करण्यात आले होते. 2019 ची लोकसभा निवडणूक ही नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी लढली गेली. मात्र नवख्या राहुल गांधींचा अनुभवी मोदींसमोर टिकाव लागला नाही आणि लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे पानिपत झाले. यथावकाश राहुल गांधीही अध्यक्षपदावरुन पायउतार झाले. (Congress proposes Sharad Pawar to contest for PM candidature)

शरद पवारच का?

पुढील लोकसभा निवडणुकांमध्ये राहुल गांधी यांना थेट पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरवण्याऐवजी शरद पवार यांच्यासारखा अनुभवी चेहरा देण्याचा काँग्रेसचा प्लान दिसत आहे. शरद पवार यांच्याकडे असलेले नेतृत्वगुण, दांडगा अनुभव, विरोधी पक्षांची मोट बांधण्याची क्षमता याचा फायदा करुन घेण्याचा काँग्रेसचा इरादा असावा.

शरद पवार लोकसभा निवडणुकीतून माघार

2019 च्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार माढा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार होते. मात्र त्याच वेळी पार्थ पवार यांनीही लोकसभा निवडणुकीत उतरण्याची इच्छा व्यक्त केली. एकाच कुटुंबातील अनेक व्यक्तींना तिकीट दिले तर चुकीचा संदेश जाईल आणि कार्यकर्ते नाराज होतील, असे मत पवारांनी त्यावेळी व्यक्त केले. सुप्रिया सुळे यांनी निवडणूक लढवणे निश्चित झाले होते. त्यामुळे नातवाच्या हट्टापायी पवार आजोबांनी निवडणुकीतून माघार घेतली. परंतु पार्थ यांच्या पदरी यश पडले नाही. त्यानंतर यावर्षी पवार राज्यसभेवर निवडून आले.

शरद पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रपतींची भेट

शरद पवार यांच्यासह काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माकप नेते सीताराम येचुरी, भाकप नेते डी. राजा, द्रमुक नेते टीकेएस एलानगोवन या विरोधीपक्षातील दिग्गजांच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपतींची भेट घेतली. यावेळी देशात पेटलेल्या शेतकरी आंदोलनावर राष्ट्रपतींसोबत चर्चा केली. कृषी कायदे रद्द करण्यासाठी सरकारला निर्देशित करण्याबाबत हस्तक्षेप करावा, अशी मागणी त्यांनी केली.

संबंधित बातम्या :

शरद पवार, राहुल गांधींसह विरोधीपक्षांचं शिष्टमंडळ राष्ट्रपतींच्या भेटीला

(Congress proposes Sharad Pawar to contest for PM candidature)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.