भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात कधी येणार? स्वागताला कोण-कोण जाणार? जाणून घ्या…
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची 'भारत जोडो यात्रा' सध्या सुरू आहे. सविस्तर माहिती वाचा...
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची ‘भारत जोडो यात्रा’ सध्या सुरू आहे. लवकरच ही पदयात्रा महाराष्ट्रात येणार आहे. याबाबत काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी माहिती दिली आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) 7 नोव्हेंबर ला यात्रा नांदेडमध्ये दाखल होणार आहे, अशी माहिती जयराम रमेश (Jayram Ramesh) यांनी दिली आहे.
‘भारत जोडो यात्रा’महाराष्ट्रात कधी?
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा 7 नोव्हेंबर ला यात्रा नांदेडमध्ये दाखल होणार आहे.
स्वागताला कोण-कोण?
राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा’महाराष्ट्रात आल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते त्यांचं स्वागत करु शकतात. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यात्रेचे स्वागत करू शकतात, अशी माहिती जयराम रमेश यांनी दिली आहे. तसंच उद्धव ठाकरेदेखील स्वागताला येऊ शकतात, असं जयराम रमेश यांनी सांगितलं आहे.
जयराम रमेश यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे
आज भारत जोडो यात्रा 48 दिवस आहे. आतापर्यंत एक तृतीयांश भाग पूर्ण झाला आहे. चार राज्यातून ही यात्रा आहे. 18 जिल्ह्यातून ही यात्रा गेली आहे. तेलगणा मध्ये 11 दिवस 11 जिल्हे राहणार आहे. यानंतर महाराष्ट्रात 16 दिवस यात्रा चालणार आहे. दररोज 21 किमी कवर केले जात आहे. आतापर्यंत 50 संस्था राहुल गांधी यांच्यासोबत भेट झाली आहे. या बैठकीत शेतकऱ्यांच्या संदर्भात मुद्दे,बेरोजगार मुद्दे आणि खासकरून लहान उद्योग आणि सोबतच वाढती महागाई संदर्भात चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
सोबतच 50 संस्था या राहुल गांधी सोबत चालली आहे. आतापर्यंत चार पत्रकार परिषद झाली आहे. प्रत्येक राज्यात एक पत्रकार परिषद होणार आहे. चार विशाल जाहीर सभा झालेल्या आहेत.