इंधन दरवाढीविरोधात नागपुरात काँग्रेसची भर पावसात रॅली, नाना पटोले, सुनिल केदार यांच्यासह शेकडो लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते सहभागी
नागपुरात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली भर पावसात सायकल यात्रा काढण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत पशुसंवर्धनमंत्री सुनिल केदार, प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, आ. अभिजित वंजारी यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी आणि शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
नागपूर : इंधन दरवाढ आणि महागाईविरोधात काँग्रेसने आज राज्यातील सर्व महसुली आयुक्त मुख्यालयाच्या ठिकाणी सायकल रॅली काढून मोदी सरकारचा निषेध केला. नागपुरात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली भर पावसात सायकल यात्रा काढण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत पशुसंवर्धनमंत्री सुनिल केदार, प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, आ. अभिजित वंजारी यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी आणि शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. (Nagpur Congress rally in heavy rains against fuel price hike)
‘केंद्रातील मोदी सरकारने कृत्रिम महागाई निर्माण करून सामान्य जनतेला आर्थिकदृष्ट्या कमकुवत केले आहे. या सामान्य माणसाच्या वेदना दिल्लीच्या सरकारपर्यंत पोहवण्यासाठी तसेच सामान्य जनतेच्या हक्कासाठी ऊन पावसाची तमा न बाळगता काँग्रेस पक्ष मोदी सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरला आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस व जिवनावश्यक वस्तूंच्या किंमती भरमसाठ वाढवल्याने सर्व प्रकारची महागाई वाढली असून लोकांचे जगणे मुश्कील झाले आहे. सरकारचे अपयश झाकण्यासाठी मंत्रीमंडळातील चेहरे बदलून चालणार नाही तर पंतप्रधानच बदलण्याची गरज आहे’, अशी घणाघाती टीका यावेळी नाना पटोले यांनी केलीय.
आपल्याच लोकांना १०० रुपयांना का?
पटोले पुढे म्हणाले की, ‘केंद्रातील नरेंद्र मोदी यांचे जुलमी, अत्याचारी सरकारमुळे जनतेचे जगणे मुश्कील झाले आहे. शेजारच्या देशात भारत 30 रुपयांनी पेट्रोल व 22 रुपयांनी डिझेल देते आणि आपल्याच लोकांना १०० रुपयांना का? हे अन्यायी मोदी सरकार उखडून फेकण्यासाठी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून सामान्य जनतेसाठी संघर्ष करत आहे’.
नवी मुंबई, पुणे, औरंगाबादेतही काँग्रेसचं आंदोलन
दुसरीकडे नवी मुंबई, पुणे, औरंगाबादेतही काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करण्यात आलं. महागाई विरोधातील काँग्रेसच्या 10 दिवसांच्या आंदोलनाच्या पुढच्या टप्प्यात शुक्रवारी प्रदेश महिला काँग्रेसच्या वतीने राज्यभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये आंदोलन करण्यात येणार आहे. पुण्यातील आंदोलनात उद्या प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेही सहभागी होणार आहेत.
संबंधित बातम्या :
हर्षवर्धन यांचा राजीनामा घेण्याऐवजी मोदींनीच राजीनामा द्यायला हवा; नाना पटोले यांचा घणाघात
Congress rally in heavy rains against fuel price hike