कसब्यात काँग्रेसचे बंडखोर शांत; चिंचवडमध्ये परिस्थिती काय? पाहा Tv 9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट

उद्धव ठाकरे गटाकडूनही राहुल कलाटे यांना शांत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. स्वतः उद्धव ठाकरे राहुल कलाटे यांच्याशी बोलणार असल्याचं ठाकरे गटाचे सचिन अहीर म्हणाले.

कसब्यात काँग्रेसचे बंडखोर शांत; चिंचवडमध्ये परिस्थिती काय? पाहा Tv 9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट
Follow us
| Updated on: Feb 09, 2023 | 11:32 PM

पुणे : कसब्यामध्ये (Kasba) काँग्रेसचे बंडखोर शांत झाले. चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं (NCP) टेन्शन कायम आहे. राहुल कलाटे उमेदवारी अर्ज मागे घेण्यास तयार नाहीत. उद्धव ठाकरे यांच्याकडून कलाटे यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कसब्यातून काँग्रेसला (Congress) मोठा दिलासा मिळालाय. बंडखोर बाळासाहेब दाभेकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. मात्र, चिंचवडमध्ये अजित पवार यांचं टेन्शन कायम आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांच्या विरोधात अजूनही बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांनी अर्ज मागे घेतलेला नाही. कलाटे अर्ज मागे घेणार का. असा प्रश्न विचारला असता अजित पवार चांगलेच भडकले.

२०१९ च्या निवडणुकीत राहुल कलाटे यांना चिंचवडमध्ये उमेदवार न देता पुरस्कृत केलं होतं. मात्र, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसनं आपला उमेदवार दिलाय. यामुळं भाजपच्या अश्विनी जगताप यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार नाना काटे उभे आहेत. त्यांच्यासमोर राहुल कलाटे यांच्या बंडखोरीचं आव्हान आहे.

माझ्या शब्दावर लोकांचा विश्वास

राहुल कलाटे यांना कुणाची फूस आहे, यावर दादांनी आपल्या स्टाईलमध्ये उत्तर दिलं. मी तुमचा रिस्पेक्ट करतो. मी महत्त्वाच्या मिटिंगला जात असताना मी बोललो. तुम्ही आलतू फालतू प्रश्न विचारले तर मी तुमच्याशी बोलण्याचा प्रश्नच येणार नाही. मीपण राज्याचा विरोधी पक्षनेता आहे. माझ्या पक्षाचा प्रमुख सहकारी म्हणून काम करतो. माझ्या शब्दावर लोकं विश्वास ठेवतात.

राहुल कलाटे उमेदवारीवर ठाम

राहुल कलाटे आधी शिवसेनेत होते. त्यामुळं उद्धव ठाकरे गटाकडूनही राहुल कलाटे यांना शांत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. स्वतः उद्धव ठाकरे राहुल कलाटे यांच्याशी बोलणार असल्याचं ठाकरे गटाचे सचिन अहीर म्हणाले. मात्र, माघार न घेण्यावर कलाटे ठाम आहेत.

बाळासाहेब दाभेकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. राहुल गांधी यांचा फोन आला. त्यामुळं उमेदवारी मागे घेतल्याचं दाभेकर म्हणाले. माघार घेण्याचं कार्यकर्त्यांनी सांगितल्याचंही ते म्हणाले.

भाजपचा विजयाचा दावा

कसब्यात नारळ फोडून भाजपनं प्रचाराला सुरुवात केली. कसब्यासह चिंचवडमध्येही विजयाचा दावा केला. महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करा, असं आवाहन अजित पवार यांनी केलंय. कसबा आणि चिंचवड या दोन्ही जागा शंभर टक्के जिंकणार असल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केलाय. महाविकास आघाडीचा काहीही फरक पडणार नसल्याचंही पाटील यांनी सांगितलं.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.