शिवरायांच्या कन्येच्या नावावरुन भाजप-काँग्रेसमध्ये जुंपली, छत्रपतींच्या अवमानाबद्दल माफी मागा, सचिन सावंतांची मागणी
19 फेब्रुवारीला काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी सात महत्वाचे मुद्दे ट्विट केले. त्यातील तिसरा मुद्दा शिवरायांच्या कन्या सकवारबाई यांच्याविषयी होता. (Sachin Sawant on Chhatrapati Shivaji Maharaj Daughter)
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कन्या सकवारबाईंच्या नावावरुन भाजप आणि काँग्रेसमध्ये सोशल मीडियावर जुंपली आहे. काँग्रेस शिवरायांचा खोटा इतिहास सांगत असल्याचा दावा भाजपने केला होता. त्यानंतर तंजावरच्या शिलालेखातील इतिहासाचे दाखले काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी प्रत्युत्तर दिले. त्याचप्रमाणे शिवरायांचा अवमान केल्याबद्दल भाजपने माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली. (Congress Sachin Sawant vs BJP on Social Media over Chhatrapati Shivaji Maharaj Daughter Name)
वादाला सुरुवात कधी?
‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान पराक्रमाला धर्माशी जोडून संकुचित करणाऱ्यांचे प्रबोधन करण्यासाठी’ असे लिहित शिवजयंती अर्थात 19 फेब्रुवारीला काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी सात महत्वाचे मुद्दे ट्विट केले. त्यातील तिसरा मुद्दा शिवरायांच्या कन्या सकवारबाई यांच्याविषयी होता.
“शिवरायांच्या कन्या सकवारबाई उर्फ सखू सासरी जात असताना शत्रू सैन्याने हल्ला केला. त्यावेळी त्यांना वाचवणाऱ्या वाल्हे गावच्या महार समाजातील मंडळींना त्यांनी भोसले हे नाव दिले. गावकुसाबाहेर राहणाऱ्या महार, मांग, घोर, चांभार व रामोशी यांना शिवरायांनी मानाचे स्थान दिले” या ट्विटचा समावेश होता.
३. शिवरायांच्या कन्या सकवारबाई उर्फ सखू सासरी जात असताना शत्रू सैन्याने हल्ला केला. त्यावेळी त्यांना वाचवणाऱ्या वाल्हे गावच्या महार समाजातील मंडळींना त्यांनी भोसले हे नाव दिले. गावकुसाबाहेर राहणाऱ्या महार, मांग, घोर, चांभार व रामोशी यांना शिवरायांनी मानाचे स्थान दिले.
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) February 18, 2021
भाजपचे काँग्रेसला उत्तर
“महाराणी सकवारबाई या शिवरायांच्या पत्नी आणि सखुबाई या कन्या ! मात्र सकवारबाईंना शिवरायांच्या कन्या लिहून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी अकलेचे तारे तोडले. काँग्रेसने स्वतःच्या खोट्या इतिहासाचे दाखले जरुर द्यावेत, मात्र शिवरायांच्या इतिहासात असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही” असा इशारा भाजपने दिला.
महाराणी सकवारबाई या शिवरायांच्या पत्नी व सखुबाई या कन्या ! मात्र सकवारबाईंना शिवरायांच्या कन्या लिहून काँग्रेसचे प्रवक्ते @sachin_inc यांनी अकलेचे तारे तोडले. काँग्रेसने स्वतःच्या खोट्या इतिहासाचे दाखले जरुर द्यावेत, मात्र शिवरायांच्या इतिहासात असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही. pic.twitter.com/TDYAZ430Cb
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) February 19, 2021
(Congress Sachin Sawant vs BJP on Social Media over Chhatrapati Shivaji Maharaj Daughter Name)
सचिन सावंत यांचे उत्तर
“इतिहास संशोधक डॉ.अशोक राणांच्या “शिवचरित्राची शिकवण” पुस्तकात शिवरायांच्या पत्नी सकवारबाई व कन्या सकवारबाई उर्फ सखू वेगळ्या आहेत असे नमूद केले आहे. इतिहास संशोधक डॉ. अनिल सिंगारे यांच्या पुस्तकात हाच उल्लेख आहे” असं उत्तर सचिन सावंत यांनी दिलं.
इतिहास संशोधक डॉ.अशोक राणांच्या “शिवचरित्राची शिकवण” पुस्तकात शिवरायांच्या पत्नी सकवारबाई व कन्या सकवारबाई उर्फ सखू वेगळ्या आहेत असे नमूद केले आहे. इतिहास संशोधक डॉ. अनिल सिंगारे यांच्या पुस्तकात हाच उल्लेख आहे. अकलेचे तारे कोणी तोडले यापेक्षा शिवरायांची शिकवण महत्वाची पण.. https://t.co/Nlh6YFZAa2 pic.twitter.com/f9xnWi61VU
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) February 20, 2021
भाजपकडे माफीची मागणी
“भाजपाचा तोंड फोडणारा पुरावा हा पहा! सकवारबाई या महाराजांच्या कन्या होत्या व एका पत्नीचे नाव ही तेच होते. भाजपाने शिवरायांचा अवमान केला. माझी बदनामी केली. अकलेचे तारे तोडल्याबद्दल भाजपने तात्काळ माफी मागावी. शिवरायांच्या इतिहासात असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत” असा इशाराही सचिन सावंत यांनी दिला.
संबंधित बातम्या :(Congress Sachin Sawant vs BJP on Social Media over Chhatrapati Shivaji Maharaj Daughter Name)
उत्तर मुंबई भाजपच्या अल्पसंख्याक सेलचा अध्यक्ष चक्क बांगलादेशी, सचिन सावंतांचा भाजपवर हल्लाबोल