विलासरावांच्या धाकट्या चिरंजीवांना उमेदवारी, काँग्रेसची दुसरी यादी जाहीर
दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे चिरंजीव धीरज देशमुख यांना लातूर ग्रामीणमधून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. यापूर्वी काँग्रेसने 51 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती.
मुंबई : काँग्रेसने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची दुसरी यादी (Congress second Candidate List) जाहीर केली आहे. काँग्रेसच्या दुसऱ्या उमेदवार (Congress second Candidate List) यादीत 52 उमेदवारांचा समावेश आहे. दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे चिरंजीव धीरज देशमुख यांना लातूर ग्रामीणमधून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. दक्षिण कराडमधून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची उमेदवारीही जाहीर झाली. यापूर्वी काँग्रेसने 51 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती.
काँग्रेस आपली पहिली यादी 29 सप्टेंबरला जाहीर करण्यात आली. या यादीत एकूण 51 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली होती. या पहिल्या उमेदवार यादीत (Congress Vidhansabha Candidate List) काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यासह 51 नावांचा समावेश होता. डॉ. विश्वजित पतंगराव कदम पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातून आणि आमदार प्रणिती शिंदे यांना सोलापूर शहर (मध्य) येथून उमेदवारी घोषित करण्यात आली होती. पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून रमेश बागवेंना भोरमधून संग्राम थोपटेंना, पुरंदरमधून संजय जगताप यांना तर जत विधानसभा मतदारसंघातून विक्रम सावंत काँग्रेसची उमेदवारी जाहीर झाली होती.
काँग्रेसने आतापर्यंत जाहीर केलेले 103 उमेदवार
- अॅड. के. सी पाडवी – अक्कलकुवा (नंदुरबार)
- पद्माकर वळवी – शहादा (नंदुरबार)
- शिरीष नाईक – नवापूर (नंदुरबार)
- शिरीष चौधरी – रावेर (जळगाव)
- हर्षवर्धन सपकाळ – बुलडाणा (बुलडाणा)
- अनंत वानखेडे – मेहकर (बुलडाणा)
- अमित झनक – रिसोड (वाशिम)
- वीरेंद्र जगताप – धामणगाव रेल्वे (अमरावती)
- यशोमती ठाकूर – तिवसा (अमरावती)
- अमर काळे – आर्वी (वर्धा)
- रणजित कांबळे – देवळी (वर्धा)
- सुनील केदार – सावनेर (नागपूर)
- नितीन राऊत – नागपूर उत्तर (नागपूर)
- विजय वडेट्टीवार – ब्रह्मपुरी (चंद्रपूर)
- सतीश वर्जूरकर – चिमूर (चंद्रपूर)
- प्रतिभा धानोरकर – वरोरा (चंद्रपूर)
- बाळासाहेब मंगळूरकर – यवतमाळ (यवतमाळ)
- अशोक चव्हाण- भोकर (नांदेड)
- डी पी सावंत – नांदेड उत्तर (नांदेड)
- वसंतराव चव्हाण – नायगाव (नांदेड)
- रावसाहेब अनंतपूरकर – देगलूर (नांदेड)
- संतोष टारफे – कळमनुरी (हिंगोली)
- सुरेश वर्पूरडकर – पाथरी (परभणी)
- कल्याण काळे – फुलंब्री (औरंगाबाद)
- शेख आसिफ शेख रशीद – मालेगाव मध्य (नाशिक)
- रोहित साळवे – अंबरनाथ (ठाणे)
- सय्यद हुसेन – मीरा भाईंदर (ठाणे)
- सुरेश कोपरकर – भांडुप पश्चिम (मुंबई)
- अशोक जाधव – अंधेरी पश्चिम (मुंबई)
- नसीम खान – चांदिवली (मुंबई)
- चंद्रकांत हंडोरे – चेंबूर (मुंबई)
- झिशान सिद्दीकी – वांद्रे पूर्व (मुंबई)
- वर्षा गायकवाड – धारावी (मुंबई)
- गणेश कुमार यादव – सायन कोळीवाडा (मुंबई)
- अमीन पटेल – मुंबादेवी (मुंबई)
- अशोक जगताप – कुलाबा (मुंबई)
- माणिक जगताप – महाड (रायगड)
- संजय जगताप – पुरंदर (पुणे)
- संग्राम थोपटे – भोर (पुणे)
- रमेश बागवे – पुणे कँटोनमेंट (पुणे)
- बाळासाहेब थोरात – संगमनेर (अहमदनगर)
- अमित देशमुख – लातूर शहर (लातूर)
- अशोक पाटील निलंगेकर – निलंगा (लातूर)
- बसवराज पाटील – औसा (लातूर)
- मधुकरराव चव्हाण – तुळजापूर (सोलापूर)
- प्रणिती शिंदे – सोलापूर मध्य (सोलापूर)
- मौलबी सय्यद – सोलापूर दक्षिण (सोलापूर)
- ऋतुराज पाटील – कोल्हापूर दक्षिण (कोल्हापूर)
- पी एन पाटील सडोलीकर – करवीर (कोल्हापूर)
- डॉ. विश्वजीत कदम – पलुस कडेगाव (सांगली)
- विक्रम सावंत – जत (सांगली)
- कुणाल पाटील – धुळे ग्रामीण
- राजेश एकाडे – मलकापूर
- राहुल सिद्धिविनायक बोंद्रे – चिखली
- स्वाती संदीप वाकेकर – जळगाव (जामोड)
- संजय रामदास बोडके – अकोट
- विवेक रामराव पारस्कर – अकोला पूर्व
- रजनी महादेव राठोड – वाशिम
- अनिरुद्ध सुभानराव देशमुख – अचलपूर
- शेखर शेंडे – वर्धा
- राजू परवे – उमरेड
- गिरिश पांडव – नागपूर (दक्षिण)
- विकास ठाकरे – नागपूर (पश्चिम)
- सहसराम कारोटे – आमगाव
- आनंदराव गेडाम – आरमुरी
- डॉ. चंदा कोडावते – गडचिरोली
- सुभाष धोटे – राजुरा
- विश्वास झाडे – बल्लारपूर
- वामनराव कासावार – वणी
- वसंत पुर्के – राळेगाव
- शिवाजीराव मोघे – आर्णी
- विजय खडसे – उंबरखेड
- भाऊराव पाटील – हिंगोली
- सुरेशकुमार जेठालिया – परतूर
- किसनराव गोरंटियाल – जालना
- डॉ. तुषार शेवाळे – मालेगाव (बाह्य)
- शिरिषकुमार कोतवाल – चांदवड
- हिरामण खोसकर – इगतपुरी
- शोएब अश्फाख उर्फ गुड्डू – भिवंडी (पश्चिम)
- कांचन कुलकर्णी – कल्याण (पश्चिम)
- राधिका गुप्ते – डोंबिवली
- कुमार खिलारे – बोरिवली
- अरविंद सावंत – दहिसर
- गोविंद सिंग – मुलुंड
- सुनिल कुमरे – जोगेश्वरी (पूर्व)
- अजंता यादव – कांदिवली (पूर्व)
- कालू करमनभाई बुधेलिया – चारकोप
- युवराज मोहिते – गोरेगाव
- जगदीश आमीन – अंधेरी (पूर्व)
- जयंती सिरोया – विलेपार्ले
- प्रविण नाईक – माहिम
- उदय फणसेकर – शिवडी
- हिरा देवासी – मलबारहिल
- डॉ. मनिष पाटील – उरण
- नंदा म्हात्रे – पेण
- दत्तात्रय बहिरत – शिवाजीनगर
- अरविंद शिंदे – कसबा पेठ
- धीरज देशमुख – लातूर ग्रामीण
- दिलीप भालेराव – उमरगाव
- पृथ्वीराज चव्हाण – कराड (दक्षिण)
- अविनाश लाड – राजापूर
- राहुल खंजिरे – इचलकरंजी
- पृथ्वीराज पाटील – सांगली
आघाडीचा फॉर्म्युला
विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी आघाडी केली आहे. दोन्ही पक्ष प्रत्येकी 125-125 जागा लढवणार आहेत. तर मित्रपक्षांसाठी 38 जागा सोडण्यात आल्या आहेत, असं शरद पवार यांनी यापूर्वीच सांगितलेलं आहे.
शरद पवारांनी बीडमधून पाच उमेदवार जाहीर केले आहेत, तर पुण्याचं जागावाटपाचं सूत्र अजित पवारांनी जाहीर केलं आहे. मात्र राष्ट्रवादी आपले उर्वरित 120 उमेदवार कधी जाहीर करणार हे समजलेलं नाही. जागावाटपाचं सूत्र ठरलेलं असलं, तरी काही जागांवर वाटाघाटीची शक्यता आहे.
काँग्रेसचं ‘सीटिंग गेटिंग’ तत्व
काँग्रेसच्या सीटिंग गेटिंग तत्वानुसार विद्यमान आमदारांना तिकीट मिळणार हे निश्चित आहे. 2014 मध्ये काँग्रेसचे 42 आमदार निवडून आले होते. मात्र त्यापैकी अनेकांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजप-शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांच्या जागी कोणत्या नव्या चेहऱ्यांना संधी मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. विशेषत: राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविरोधात काँग्रेस कुणाला उमेदवारी (Congress Vidhansabha Candidate List Date) देणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.