सावरकरांबाबत काँग्रेस सेवादलाचं वादग्रस्त पुस्तक, भोपाळची घाण महाराष्ट्रात येणार नाही, संजय राऊतांनी ठणकावलं
मध्य प्रदेशातील काँग्रेस सेवादलामार्फत स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत (Congress Seva dal book on Veer Savarkar) छापण्यात आलेल्या पुस्तकावरुन वाद उफळला आहे.
मुंबई : मध्य प्रदेशातील काँग्रेस सेवादलामार्फत स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत (Congress Seva dal book on Veer Savarkar) छापण्यात आलेल्या पुस्तकावरुन वाद उफळला आहे. या वादग्रस्त वक्तव्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. “वीर सावरकर (Congress Seva dal book on Veer Savarkar) आमच्यासाठी महान होते आहेत आणि राहतील त्यांच्यावरची आमची श्रद्धा अशा प्रकारच्या फालतू पुस्तकाने कमी होणार नाही”, असं संजय राऊत म्हणाले.
“भोपाळमधले काँग्रेसचे गोपाळराव कोण आहेत माहित नाही. पण शिवसेनेने अनेकदा भूमिका स्पष्ट केली आहे तरीही आपण वारंवार का विचारता? वीर सावरकर आमच्यासाठी महान होते आहेत आणि राहतील त्यांच्यावरची आमची श्रद्धा अशा प्रकारच्या फालतू पुस्तकाने कमी होणार नाही”, असं संजय राऊत यांनी ठणकावलं.
Sanjay Raut,Shiv Sena on a statement in Congress Seva Dal booklet ‘Godse&Savarkar had a physical relationship’: Veer Savarkar was a great man and will remain a great man. A section keeps talking against him,it shows the dirt in their mind,whoever they might be pic.twitter.com/Yv3aLJjraC
— ANI (@ANI) January 3, 2020
भोपाळची घाण महाराष्ट्रात येणार नाही. ते पुस्तक अनधिकृत आहे त्यावर बंदी आहे. अशी पुस्तके तरीही वाटली जातात, भाजपच्या नेत्यांविषयीही वाटली गेली आहे. सावकरांविषयी कोणीही आम्हाला कुणी ज्ञान देण्याची गरज नाही. सावरकर देशाला प्रिय आहेत आणि यापुढेही राहतील, असं संजय राऊत यांनी नमूद केलं.
सावरकरांवर आक्षेप घेणारे जे लोक आहेत त्यांचं डोकं तपासले पाहिजे. सतत वीर सावरकार यांच्याबद्दल आरोप करणे ही त्यांच्या मेंदूतील घाण आहे मग ते कोणीही असोत. वीर सावरकर हे आमच्यासाठी महान होते आणि राहतील, असं राऊत यांनी सांगितलं.
वादग्रस्त पुस्तक
मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये काँग्रेस सेवादलाने विनायक दामोदर सावरकर यांच्याबाबत एक पुस्तक प्रकाशित केलं आहे. या पुस्तकात अनेक वादग्रस्त टिपण्या आहेत. सावरकर आणि नथुराम गोडसे यांच्या संबंधांबाबतचा वादग्रस्त उल्लेख या पुस्तकात केला आहे.
आशिष शेलार यांचं ट्विट
या पुस्तकवादानंतर भाजप नेते आशिष शेलार यांनीही ट्विट करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सवाल विचारत, या पुस्तकावर महाराष्ट्रात बंदीची मागणी केली आहे.
मा.मुख्यमंत्री महोदय तुमच्या महाराष्ट्र धर्माच्या पालनात जर स्वा.सावरकर येत असतील?तर तातडीने सावरकरांची बदनामी करणाऱ्या काँग्रेसच्या पुस्तिकेवर महाराष्ट्रात बंदी घाला.मराठी बाणा दिसू द्या! देशभक्तीच्या प्रतिकांवर काँग्रेसकडून होणाऱ्या हल्ल्यांचा निषेध. आम्ही सारे सावरकर!
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 3, 2020